शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Omicron Cases In India : दहाव्या दिवशी बरा झाला पुण्यातील ओमायक्रॉनचा रुग्ण; जयपूरमधील ९ जणांचेही रिपोर्ट निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 09:17 IST

1 / 12
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉन (Omicron) बाबत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, ओमायक्रॉनपासून घाबरण्याचं कारण नसून मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांकडून करण्यात आलं होतं.
2 / 12
देशात काही ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले होतं. याच दरम्यान आता एक सकारात्मकम माहिती समोर आली आहे. पुण्यातील ओमायक्रॉन ग्रस्त एक व्यक्ती दहाव्या दिवशी निगेटिव्ह आली आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या जयपूरमध्ये सापडलेल्या ९ जणांचे रिपोर्ट्सही आता निगेटिव्ह आले आहेत.
3 / 12
या रुग्णांना जयपूरच्या RUHS रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. परंतु त्यांना आता सात दिवस होम क्वारंटाइन राहावं लागेल. राज्याच्या आरोग्य विभागानुसार सर्व नऊ रुग्ण हे तंदुरुस्त असून त्यांच्यात कोणतीही लक्षण नाही. त्यांचं सिटी स्कॅन आणि अन्य चाचण्याही सामान्य आहेत.
4 / 12
दरम्यान, कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटच्या माहितीनंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असल्याची माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री परसादी लाल मीणा यांनी दिली.
5 / 12
'जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल आल्यानंतर संसर्ग झालेल्या व्यक्तींना आरयूएचएसमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले होते. यानंतर संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचं ट्रॅकिंग ट्रेसिंग सुरू केलं,' असं मीणा म्हणाले.
6 / 12
नऊ मधील चार जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुपारी आणि अन्य पाच जणांना संध्याकाळी रुग्णालयातून सोडण्यात आलं. सर्व रुग्णांना आता होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आलाय,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
7 / 12
'ओमायक्रॉन या विषाणूचा संसर्ग अधिक आहे. परंतु हा डेल्टा व्हेरिअंटप्रमाणे घातक नाही. ओमायक्रॉनवर सध्या संशोधन सुरू आहे. हा विषाणू तेजीनं पसरतो, परंतु तो डेल्टासारखा घातक दिसत नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणाऱ्यांवर याचा कमी परिणाम दिसेल,' अशी माहिती सवाई मान सिंह मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुधीर भंडारी यांनी दिली.
8 / 12
गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा रुग्ण समोर आल्यानंतर बडोद्यातील दोन सरकारी रुग्णालयांमध्ये एसएसजीमध्ये ५० तर गोत्री मेडिकल हॉस्पीटलमध्ये २० ओमायक्रॉन डेडिकेटेड वॉर्ड तयार करण्यात आले आहे.
9 / 12
ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर हीच योग्य वेळ आहे अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. टेड्रॉस घेब्रेयसेस यांनी जगाला सतर्क केलं आहे. जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहाता त्याचा एकूणच कोरोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. जर ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर आणखी रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावलं उचलायला हवीत. हीच योग्य वेळ आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.
10 / 12
ओमायक्रॉनचं जागितक पातळीवर वेगाने पसरणं किंवा ३० हून अधिक संख्येने असणारे म्युटेशन या गोष्टी हेच दर्शवत आहेत की त्याचा कोरोना साथीचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण तो परिणाम नेमका काय असेल, हे मात्र आत्ता सांगता येणं कठीण आहे असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.
11 / 12
अमेरिकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी ओमायक्रॉनबाबत महत्त्वाती माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत जास्त गंभीर नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
12 / 12
ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे परंतु सुरुवातीचे संकेत सूचित करतात की तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी घातक आहे. भारतासह जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे की जरी ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी तो फारसा घातक नाही.
टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत