1 / 14कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीच्या वर गेली आहे. 2 / 14कोरोनाच्या आकडेवारीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. देशात देखील कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. 3 / 14देशातील कोरोनाग्रस्तांचा आकड्याने तब्बल सात लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णांची संख्या ही 719,665 वर गेली आहे. तर आतापर्यंत 20,160 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 4 / 14देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 22,252 नवे रुग्ण आढळून आले असून 467 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अनेकांनी करोनावर मात केली असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.5 / 14कोरोनाचा संकटात दिलासादायक माहिती मिळत आहेत. तर काही ठिकाणी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 6 / 14देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या मुंबई आणि दिल्लीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. 7 / 14महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आता मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये ही रुग्णांची संख्या कमी होत आहे. 8 / 14दिल्लीमध्ये आज 19 दिवसांत पहिल्यांदाच एक दिवसात कोरोनाचे 2000 हून कमी रुग्ण आढळून आले आहेत. मात्र याच दरम्यान देशातील काही राज्यांनी चिंता वाढवली आहे. 9 / 14पंजाब, गोवा आणि झारखंडमध्ये आतापर्यंत कोरोनावर नियंत्रण होते. मात्र अनलॉक 2.0 मध्ये अनेक गोष्टीत सूट देण्यात आल्याने रुग्णांची संख्या ही वेगाने वाढताना दिसत आहे. 10 / 1419 मे ते 1 जूनपर्यंत कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब आणि छत्तीसगड या राज्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी होता. पण आता हा रेट वेगाने वाढत आहे. 11 / 14कर्नाटकमध्ये हा रेट सर्वाधिक आहे. 19 मे ते 1 जून दरम्यान हा रेट 1.35 होता आणि आता 19 जून ते 2 जुलैमध्ये वाढून 5.74 झाला आहे. कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. 12 / 14आंध्र प्रदेशमध्ये 19 मे ते 1 जूनमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 1% पेक्षा कमी होता मात्र आता तो वाढून 2.68% झाला. तर पंजाबमध्ये 0.8 टक्क्यांवरून 2.15 टक्के झाल्याची माहिती मिळत आहे.13 / 14आंध्र प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त नव्हता मात्र आता या राज्यांमधील दर हा गेल्या महिन्यांच्या तुलनेत आता डबल झाला आहे. 14 / 14जम्मू-काश्मीरमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 1.61% होता. तो आता 2.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.