1 / 12जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही वेगाने वाढत असून तब्बल 35 लाखांच्यावर गेली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे.2 / 12भारतासह जगातील अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. 3 / 12सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढत आहे.4 / 12भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 42 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. 5 / 12देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 42 हजार 533 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 6 / 12आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (4 मे) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे.7 / 12कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. 8 / 12कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली असून 11,706 जणांनी लढाई जिंकली आहे. जवळपास 27.5 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे.9 / 12लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक भागांत नागरिकांना काही सूट देण्यात आली असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आहे.10 / 12गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.11 / 12राज्यांदरम्यान कार्गो सेवेदरम्यान अडथळा येऊ नये यासाठी गृह मंत्रालयाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. 12 / 12गृह मंत्रालयाचा कंट्रोल रुम नंबर 1930 आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हेल्पलाईन क्रमांक 1033 याचा वापर करून चालक आणि ट्रान्सपोर्टर लॉकडाऊन संबंधित आपल्या तक्रारींवर नोंदवू शकतात.