CoronaVirus Live Updates : धोका वाढला! लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार; रिसर्चमधून दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:00 IST
1 / 15देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 3,24,49,306 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,072 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 389 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 15कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,34,756 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. 3 / 15कोरोनावर संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे. अशीच पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. 4 / 15कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता डेल्टाचं 74 टक्के संक्रमण हे लक्षणं दिसण्याआधीच झाल्याचं समोर आलं आहे. एका रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे. 5 / 15हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे एपिडेमोलाजिस्ट बेंजामिन काउलिंग यांनी अशा परिस्थितीत कोरोनाचं संक्रमण रोखणं अत्यंत कठीण असल्याचं म्हटलं आहे. याच कारणामुळे अनेक देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. 6 / 15संशोधकांनी मे-जून दरम्यान 101 लोकांची तपासणी करण्यात आली होती. डेल्टा संक्रमित असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसण्यासाठी लागणारा वेळ हा 5.8 दिवसांचा होता. मात्र त्याआधीच कोरोनाचा प्रसार होत होता. 7 / 15रिसर्चमधून ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांना देखील डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 15कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका निर्माण झाला आहे. तसेच आता बेल्स पॉल्सी देखील घातक ठरत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनातून ठिक झाल्यानंतर देखील कोरोना रुग्णांची पाठ सोडत नाही.9 / 15म्युकोरमायकोसिसनंतर आता बेल्स पॉल्सीचा सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत याचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.10 / 15मुंबईत राहणाऱ्या 55 वर्षीय एका व्यक्तीला 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. मात्र उपचारानंतर ते ठीक झाले. 31 जुलै रोजी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस देखील घेतला आहे.11 / 15लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या व्यक्तीच्या कुटुंबाला त्याच्या चेहऱ्यावा लकवा मारलेला दिसला. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर सध्या त्यांच्यावर उपचार करत आहेत.12 / 15वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इन्साकॉगने बुलेटिन जारी करून डेल्टा व्हेरिएंटवर चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत 72 हजारांहून अधिक सँपल्सचं जीनोम सीक्वेंसिंग करण्यात आलं आहे.13 / 1520 हजारांहून अधिक सँपल्समध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. रिपोर्टनुसार, देशात 72931 सँपलचं जीनोम सीक्वेंसिंग करण्यात आलं. त्यातील 30230 जणांमध्ये कोरोनाचे गंभीर व्हेरिएंट आढळून आले आहेत.14 / 15इन्साकॉगनुसार, आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंटमध्ये 13 म्यूटेशन झाले आहेत. ज्यातील पाच भारतातही आहेत. अमेरिका, ब्रिटन, चीनसह 100 हून अधिक देशांमध्ये डेल्टाचे रुग्ण आढळून आले आहेत.15 / 15रिपोर्टनुसार, 6.7 कोटी लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1.20 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली असून देखील ते संक्रमित झाले आहेत.