शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेमागे Omicron चा 'हा' सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, भारताला किती धोका?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 7:44 PM

1 / 14
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले असून काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 14
जगभरातील अनेक देशांत पुन्हा एकदा संसर्ग वाढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाने सर्व रेकॉर्ड मोडले असून आता युरोपमध्ये ही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी Omicron चा सब-व्हेरिएंट BA.2 मुळे पुन्हा एकदा संसर्ग वाढत असून तो आतापर्यंतचा सर्वात घातक व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे.
3 / 14
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, Omicron चे 5 सब-व्हेरिएंट आहेत. BA.1, BA.1.1, BA.2, BA.2.2 आणि BA.3. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान जगभरात अनेक ठिकाणी BA.2 ची प्रकरणं समोर आली आहेत. BA.2 चा सर्वात पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला होता.
4 / 14
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम फक्त चीन आणि युरोप पुरताच मर्यादित राहणार नाही. जगात रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तो घातक असल्याचं म्हटलं जातं अशा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
5 / 14
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे मेडिकेयर टीमचे हेड राहिलेले एंडी स्लेविट यांनी ट्विट करत ज्या प्रकारे युरोपात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. तसाच काही दिवसात अमेरिकेत देखील वाढू शकतो असं म्हटलं आहे.
6 / 14
WHO चे माजी सदस्य एंड्रियन एस्टरमॅन यांनी ट्वीट केलंय की, BA.1 च्या तुलनेत BA.2 हा 1.4 पट अधिक संसर्ग वाढवतो आहे. BA.2 हा व्हेरिएंट कमीत कमी 12 लोकांचा संक्रमित करू शकतो.
7 / 14
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,876 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 98 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,16,072 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
8 / 14
IMA कोच्चीचे रिसर्च सेलचे हेड डॉ. राजीव जयदेवन यांच्या मते भारतात चीनपेक्षा जबरदस्त हायब्रिड इम्युनिटी आहे. मागच्या वर्षी दुसरी लाट आली होती. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला. ज्यामुळे लोकांची इम्युनिटी वाढली. त्यामुळे भारतात कोरोनाचा संसर्ग कमी आहे.
9 / 14
कोविड टास्क फोर्स NTAGI चे प्रमुख डॉ. नरेंद्र कुमार अरोडा यांनी भारतात BA.2 चे रुग्ण वाढण्याची शक्य़ता कमी आहे. पण जर नवा व्हेरिएंट आला तर रुग्णांची संख्या वाढू शकते. 22 जूनपर्यंत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे असं म्हटलं आहे.
10 / 14
डॉ. जयदेवन यांनी चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी भारतात संसर्ग वाढण्याची शक्यता कमी आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
कोरोना व्हायरस संसर्गाची लाट संपत नाही तोपर्यंत नवीन म्युटेशन समोर येत आहे. याच दरम्यान आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या नव्या संशोधनातून हे समोर आलं आहे.
12 / 14
कोरोना व्हायरसचं नवीन म्यूटेशन विध्वंस आणू शकतो. हा नवीन प्रकार डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की हे नवीन कॉम्बिनेशन व्हायरसबद्दल आधीच भीती होती कारण ते दोन्ही खूप वेगाने पसरत आहेत.
13 / 14
WHO मध्ये कोरोना टेक्निकल टीमचे नेतृत्व करणाऱ्या मारिया वॅन कर्खोव यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की हे अपेक्षित होतं, विशेषत: हे दोन्ही प्रकार खूप वेगाने पसरत आहेत. WHO या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि या संदर्भात अभ्यास सुरू आहे.
14 / 14
जेव्हा सुरुवातीला लोकांना डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारांच्या एकत्रित प्रकाराची भीती वाटली आणि त्याला डेल्टाक्रोन म्हटलं गेलं, तेव्हा WHO ने सांगितले की डेल्टा आणि ओमायक्रॉन कॉम्बिनेशन असं काहीही नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारत