६४ दिवसांत भारतात कोरोनाचे रुग्ण लाखाच्या घरात; जाणून घ्या इतर देशांमधील आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 5:41 PM
1 / 12 जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनानं भारतातही थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा लाखाच्या पुढे गेला आहे. 2 / 12 एक लाख कोरोना रुग्ण असलेला भारत हा जगातला ११ वा देश ठरला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात तीन हजाराहून अधिक जणांनी जीव गमावला आहे. 3 / 12 मात्र भारतातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग बऱ्यापैकी कमी असल्याचं आकडेवारी सांगते. भारतात रुग्णांचा आकडा लाखाच्या घरात पोहोचण्यासाठी ११० दिवस लागले. 4 / 12 देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी आढळला. सुरुवातीला महिनाभर कोरोना संक्रमणाचा वेग कमी होता. 5 / 12 मार्चनंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली. अवघ्या ६४ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १०० हून १ लाखावर पोहोचला. 6 / 12 गेल्या काही दिवसांत देशातल्या कोरोना रुग्णांचा वेगानं वाढतो आहे. मात्र अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्सच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. 7 / 12 अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढण्याचा वेग सर्वाधिक वेग होता. १०० ते १ लाख रुग्णांचा टप्पा अमेरिकेनं अवघ्या २५ दिवसांत गाठला. 8 / 12 स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ३० दिवसांमध्ये एक लाखाच्या घरात गेली. 9 / 12 जर्मनीमधील कोरोना बाधितांची संख्या ३५ दिवसांत १०० वरुन लाखावर पोहोचली. 10 / 12 इटलीमधील कोरोना रुग्णांची संख्या ३६ दिवसांमध्ये १०० वरुन १ लाखांवर गेली. 11 / 12 फ्रान्सनं ३९ दिवसांमध्ये १०० ते १ लाख रुग्णांचा टप्पा गाठला. 12 / 12 ब्रिटनमधल्या कोरोना बाधितांचा आकडा ४२ दिवसांत १०० वरुन १ लाखांवर गेला. आणखी वाचा