शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी नागरिकांचे होणार लसीकरण, या व्यक्तींना असेल प्राधान्य

By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 4:21 PM

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनेही कोरोनाविरोधातील लसीकरणाची तयारी सुरू केली आहे.
2 / 9
या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ३० कोटी नागरिकांना कोरोनाविरोधातील लस दिली जाईल.यामध्ये कोरोनाचा अधिक धोका असलेल्या लोकसंख्येसोबतच आरोग्य कर्मचारी, पोलीस, सॅनिटायझेशन कर्मचारी यांच्यासारख्याा फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल.
3 / 9
पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी लोकांसाठी ६० कोटी लसी लागतील. कोरोनावरील लसीला मान्यता देण्यात आल्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली जाईल. कोरोनाच्या लसीसाठी प्राधान्यक्रम ठरवण्यात आला असून, या प्राधान्यक्रमानुसार चार गट करण्यात आले आहे.
4 / 9
या गटांमध्ये सुमारे ५० ते ७० लाख हेल्थकेअर प्रोफेशनल्स, सुमारे दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स, ५० वर्षांवरील वयोगटातील सुमारे २६ कोटी व्यक्ती आणि ५० वर्षांखालील कमी वयाच्या मात्र अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
5 / 9
कोरोनावरील लसीसाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने एक मसुदा तयार केला आहे. त्यासाठी केंद्रीय एजन्सी आणि राज्यांकडूनही इनपुट्स मिळाले होते. नीती आयोगाच्ये सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील या गटाने जी रणनीती आखली आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये देशातील २३ टक्के लोकसंख्येला कोरोनाची लस देण्यात येईल.
6 / 9
तज्ज्ञांच्या समितीने बांधलेल्या अंदाजानुसार देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रात मिळून सुमारे ७० लाख हेल्थकेअर वर्कर्स आहेत. यामध्ये ११ लाख एमबीबीएस डॉक्टर, ८ लाख आयुष प्रॅक्टिशनर्स, १५ लाख परिचारिका, ७ लाख एएनएम आणि १० लाख आशा वर्कर्सचा समावेश आहे. लसीकरणासाठीची यादी ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार होऊ शकते.
7 / 9
ड्राफ्ट प्लॅननुसार ४५ लाख पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच लष्कराच्या १५ कर्मचाऱ्यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय कम्युनिटी सर्व्हीस पब्लिक ट्रान्स्पोर्ट ड्रायव्हर्स, क्लीनर्स आणि शिक्षकांचीही यादी तयार करण्यात आली आहे. या सर्वांची मिळून एकूण संख्या सुमारे दीड कोटी एवढी आहे.
8 / 9
तसेच ५० वर्षांवरील सुमारे २६ कोटी व्यक्तींना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाईल. याशिवाय डायबिटीस, हृदयरोग, किडनीचे आजार, फुप्फुसाचे आजार, कॅन्सर यासारख्या आजारांचा त्रास असलेल्या व्यक्तींनाही प्राधान्यक्रमाने लस दिली जाईल.
9 / 9
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्राधान्य क्रम ठरवलेल्या अनेक गटांमध्ये ओव्हरलॅपिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमावरील लोकसंख्येच्या लसीकरणासाठी एकूण ६० कोटी लसींची गरज भासणार आहे. तसेच लसीकरणासाठीच्या प्लॅनमध्ये स्टॉक पोझिशन, स्टोरेज फॅसिटिलीमधील तापमान, जियोटॅग हेल्थ सेंटर्सना टॅग करण्याचीही व्यवस्था आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य