CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये वेगळीच खेळी; 'त्या' निर्णयामुळे भरणार मोदी सरकारची झोळी By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 10:27 PM
1 / 11 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटाच्या काळात पीएम केअर्स ट्रस्ट सुरू केला. दोन आठवड्यांपूर्वीच सरकारनं पीएम केअर्समधून करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील जाहीर केला. 2 / 11 काँग्रेसनं पीएम केअर्सच्या ऑडिटची मागणी करताच सरकारनं ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेला खर्च जाहीर केला. 3 / 11 कोरोना विरुद्धच्या लढाईत पीएम केअर्समधून ३ हजार १०० कोटी दिल्याची माहिती सरकारनं दिली. 4 / 11 मोदी सरकारनं पीएम केअर्सबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काल याबद्दलचं गॅझेट नोटिफिकेशन काढण्यात आलं. 5 / 11 कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं गॅजेट नोटिफिकेशनच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ च्या कलम ४६७ च्या उपकलम (१) मध्ये बदल केला. 6 / 11 कंपनी कायद्यातल्या बदलामुळे आता कंपन्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत निधी पीएम केअर्सला देता येईल. 7 / 11 सरकारनं काढलेल्या गॅझेट नोटिफिकेशनमुळे आता कंपन्यांना त्यांचा सीएसआर फंड पीएम केअर्समध्ये जमा करता येईल. 8 / 11 आतापर्यंत केवळ पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीलाच सीएसआर फंड देण्याची तरतूद होती. मात्र आता ती बदलण्यात आली आहे. 9 / 11 विशेष म्हणजे नोटिफिकेशनच्या माध्यमातून लागू झालेला बदल २८ मार्च म्हणजेच दोन महिन्यांपूर्वीच लागू झाला आहे. 10 / 11 आपत्ती काळासाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असताना पीएम केअर्स कशासाठी असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला होता. 11 / 11 पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी माहिती अधिकाराच्या अंतर्गत येतो. त्याच प्रकारे पीएम केअर्सही येणार का, त्याचा हिशोब सरकार जनतेला देणार का, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले होते. आणखी वाचा