शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Test at Home: मोठा दिलासा! आता घरबसल्या स्वत:च करा कोरोना चाचणी; टेस्ट किटला परवानगी, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 8:40 AM

1 / 11
Rapid Antigen Kits to conduct Covid test at home: नवी दिल्ली : कोरोना चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या भल्यामोठ्या रांगा आणि त्याचे रिपोर्ट येण्यास लागणारा वेळ हे त्रास वाचणार आहेत. तसेच रांगेत, गर्दीत गेल्याने कोरोना नसला तरी होण्याच्या भीतीने कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार कमी होणार आहेत. (India approved on Wednesday the first home test for Covid-19)
2 / 11
corona testing at home: कारण आता घरच्या घरी स्वत:च कोरोनाची चाचणी करता येणार आहे. ICMR कडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत.
3 / 11
घरच्या घरी रॅपिड अंटिजेन किट्स (Rapid Antigen Kits) द्वारे कोरोना चाचणी करण्यास इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) परवानगी दिली आहे. (ICMR issued detailed guidelines on who can use it and how.)
4 / 11
यासाठी आयसीएमआरने काही अटी घातल्या आहेत. यानुसार कोण कोण कोरोना टेस्ट आपल्या घरी करू शकतात याच्या गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत.
5 / 11
केवळ कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्ती आणि कोरोना बाधिताच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्ती त्यांच्या घरीच रॅपिड अँटिजेन किट घेऊन कोरोना चाचणी करू शकणार आहेत.
6 / 11
महत्वाचे म्हणजे हा कोरोनाबाधित परनावगी असलेल्या लॅबोरेटरीमधील चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेला असायला हवा. तसेच अंदाधुंद म्हणजेच अंदाज घेण्यासाठी किंवा शंका असल्यास चाचणी करण्यास सुचविण्यात आलेले नाही.
7 / 11
जे व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येतील त्यांना खरे पॉझिटिव्ह रुग्ण मानले जाणार आहे. त्यासाठी पुन्हा चाचणी गरजेची नाही. तसेच जे लक्षणे असलेले व्यक्ती रॅटमध्ये निगेटिव्ह येतील, त्यांनी लगेचच RTPCR टेस्ट करून घ्यायची आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
8 / 11
घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी नवीन किटला आयसीएमआरने हिरवाकंदील दाखविला आहे. पुण्याची कंपनी Mylab Discovery Solutions Ltd. ने CoviSelfTM (PathoCatch) COVID-19 OTC Antigen LF हे किट बनविले आहे.
9 / 11
यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरू एक अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. यावर तुमचे नाव आणि नंबर टाकून रजिस्टर करावे लागणार आहे. या अॅपची आणि युजर गाईडची लिंक या टेस्ट किटवर दिली जाणार आहे.
10 / 11
त्यावर दिलेल्या प्रक्रियेनुसार कोरोना चाचणी केल्यानंतर त्या किटचा फोटो काढून त्या अॅपवर अपलोड करावा लागणार आहे.
11 / 11
घरीच कोरोना टेस्ट किटची किंमत 250 रुपये ठेवण्यात आली आहे. या किटद्वारे 15 मिनिटांत रिझल्ट येणार आहे. (Corona home test kit costs ₹250 )
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या