1 / 9आशियातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. सिंगापूर, चीन, थायलंड, हाँगकाँग आणि भारतात नवीन लाट आल्याचं म्हटलं जात आहेत. १९ मे २०२५ पर्यंत, भारतात २५७ एक्टिव्ह रुग्ण नोंदवले गेले. पण आरोग्य तज्ज्ञांनी घाबरण्याची गरज नाही, फक्त सतर्क काहा, काळजी घ्या असं म्हटलं आहे. 2 / 9सिंगापूरमध्ये मे २०२५ च्या सुरुवातीला १४,००० हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत २८% जास्त आहे. हाँगकाँगमध्ये १० आठवड्यात रुग्णांची संख्या ३० पट वाढली आहे. चीनमध्येही प्रकरणे वेगाने वाढत आहेत. तिथे टेस्ट पॉझिटिव्हिटी दर दुप्पट झाला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या सोंगक्रान फेस्टिव्हलनंतर थायलंडमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली. भारतात २५७ एक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यापैकी बहुतेक केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील आहेत.3 / 9ही नवीन लाट ओमायक्रॉनच्या JN.1 व्हेरिएंट आणि त्याच्या सब व्हेरिएंट LF.7 आणि NB.1.8 मुळे आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डिसेंबर २०२३ मध्ये JN.1 ला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून घोषित केलं. हा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे, परंतु तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, तो आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे आणि शरीरदुखी अशी सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.4 / 9भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत एक्टिव्ह प्रकरणं खूपच कमी आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असतात. रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, देशात कोरोनाची नवीन लाट येण्याचं कोणतेही सध्या संकेत नाहीत, परंतु सतर्कता गरजेची आहे.5 / 9आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, जसं की वृद्ध, लहान मुलं किंवा ज्यांना मधुमेह, कॅन्सरसारखे आजार आहेत. त्यांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्येही लोकांना बूस्टर डोस घेण्यास सांगितलं जात आहे.6 / 9WHO च्या मते, XBB.1.5 मोनोव्हॅलेंट बूस्टर लस JN.1 व्हेरिएंटपासून १९% ते ४९% संरक्षण देते. पण जर तुम्ही आधी लस घेतली असेल आणि तुम्ही निरोगी असाल तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही.7 / 9विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला. नियमितपणे हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका.8 / 9जर तुम्ही सिंगापूर, हाँगकाँग, चीन किंवा थायलंड सारख्या देशांमध्ये जात असाल तर काळजी घ्या. अनावश्यक प्रवास टाळा. ताप, खोकला किंवा घसा खवखवणे यासारखी लक्षणे आढळल्यास ताबडतोब चाचणी करा.9 / 9आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणं आहे की ही लाट पूर्वीइतकी धोकादायक नाही. बहुतेक लोक सौम्य लक्षणांसह बरे होत आहेत. भारतातही परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही निरोगी असाल. जर तुम्ही आधीच लस घेतली असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. परंतु कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी बूस्टर डोसचा विचार करावा आणि सावधगिरी बाळगावी.