By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:30 IST
1 / 7देशातील औषधी नियामक सर्वोच्च संस्था सीडीएससीओने ३५ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांचे उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी घातली आहे.2 / 7वेदनाशामक, पोषणसंबंधी पूरक आहार व मधुमेह रोधी औषधांचा यात समावेश असून, याच्या बंदीबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना निर्देश देण्यात आले आहेत.3 / 7एफडीसी या अशा औषधी आहेत, ज्यात एका निश्चित प्रमाणात दोन किंवा अधिक फार्मास्युटिकल घटकांचा वापर केलेला असतो.4 / 7सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना असा एफडीसीसाठी आढावा घेण्यास व तरतुदींचे कडक पालन करण्यास सांगण्यात आले आहे. 5 / 7काही एफडीसी औषधींना सुरक्षा व परिणामकारकतेच्या पूर्व मूल्यांकनाशिवाय उत्पादन, विक्री व वितरणाचे परवाने देण्यात आले होते. त्यामुळे लोकांचे आरोग्य व सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण झाला होता. अशा औषधींवर ही कारवाई करण्यात आली आहे.6 / 7११ एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रात भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) डॉ. राजीव रघुवंशी यांनी त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या जानेवारी २०१३ च्या पत्राचा हवाला दिला आहे.7 / 7भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) डॉ. राजीव रघुवंशी यांनी पत्रात म्हटले आहे की, सुरक्षा व परिणामकारकतेच्या पूर्व मूल्यांकनानुसार काही एफडीसी औषधींचे उत्पादन, विक्री व वितरणाचे परवाने दिले आहेत. यामुळे लोकांचे आरोग्य व सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.