शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

म्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 8:39 PM

1 / 7
पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो काश्मीरमध्ये, असं म्हटलं जातं. पण भौगोलिक स्थान, राजकीय अस्थिरतेमुळे काश्मीरमध्ये भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळे असे कायदे लागू करण्यात आलेले आहेत.
2 / 7
काश्मीरमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नाही. तसेच काश्मीरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या राज्याची राजधानी दर सहा महिन्यांनी बदलते.
3 / 7
येथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानामुळे काश्मीरची राजधानी दर सहा महिन्यांनी बदलली जाते.
4 / 7
हिवाळ्यात काश्मीरची राजधानी सहा महिन्यांसाठी श्रीनगरहून जम्मू येथे हलवली जाते. तर उन्हाळ्याच्या दिवसात उर्वरित सहा महिने काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे असते.
5 / 7
काश्मीरमध्ये या प्रक्रियेला दरबार मुव्ह असे म्हणतात. ही प्रक्रिया ब्रिटिश काळापासून सुरू आहे, मात्र ती अद्याप बदलण्यात आलेली नाही.
6 / 7
राजधानी बदलण्याची प्रथा 1862 रोजी डोग्रा शासक गुलाब सिंह यांनी सुरू केली होती. गुलाब सिंह हे महाराज हरिसिंह यांचे वंशज होते.
7 / 7
राजधानी श्रीनगरहून जम्मूला हलवण्याची प्रक्रिया खर्चिक असल्याने तिला विरोधही होत आहे.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन