शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धनत्रयोदशीला स्वस्त सोने खरेदीची संधी; उद्यापासून सुरु होतेय मोदी सरकारची स्कीम

By हेमंत बावकर | Published: November 08, 2020 2:19 PM

1 / 10
धनतेरस सण येणार आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे लाखो लोक याच दिवसाची वाट पाहत असतात. या मुहूर्तावर केंद्र सरकार स्वस्त सोने खरेदीची संधी घेऊन आली आहे.
2 / 10
सध्या सोन्याचा दर 50000 पेक्षा जास्त आहे. यामुळे सर्वसामान्यांना या मुहूर्तावर सोने खरेदी करणे कठीण आहे. केंद्र सरकारच्या या नव्या स्कीममध्ये तुम्हाला प्रत्यक्ष सोने खरेदी करता येणार नाहीय.
3 / 10
खरेतर केंद्र सरकार सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम पुन्हा एकदा घेऊन आली आहे. ही स्कीम 9 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष सोने खरेदी जरी नसली तरीही सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकणार आहात.
4 / 10
या स्कीममधून तुम्ही बॉन्ड खरेदी करू शकता. यामध्ये एक ग्रॅम ते चार किलो सोने खरेदी करता येणार आहे. या सोन्याच्या बॉन्डची किंमत बाजारमुल्यापेक्षा कमी असते.
5 / 10
आजच्या सोन्याच्या दराचा विचार केल्यास सोने प्रति तोळा 54,145 रुपये आहे. म्हणजेच ग्रॅमला 5,414.5 रुपये आहे. तर गोल्ड बॉन्डची किंमत प्रति ग्रॅम ही 5,177 असणार आहे.
6 / 10
इतर वेळे सारखेच यावेळीही ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट दिली जाणार आहे. म्हणजेच सोने प्रतिग्रॅम 287 कमी किंमतीने खरेदी करता येणार आहे.
7 / 10
अशा गुंतवणूकदारांना अर्ज केल्यानंतर त्याचे पैसे ऑनलाईनच पे करावे लागणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सांगितले की एका ग्रॅमच्या बॉन्डचे मूल्य हे 5217 रुपये असणार आहे.
8 / 10
हा बॉन्ड आठ वर्षांच्या मुदतीचा असतो. परंतू जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल तर पाच वर्षांनी बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
9 / 10
हा बॉन्ड खरेदी करण्यासाठी बँक, बीएसई, एनएसईच्या वेबसाईटवर किंवा पोस्टात जाऊन खरेदी करता येणार आहे.
10 / 10
ही एकप्रकारची सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यामध्ये ना ही सोन्याच्या शुद्धतेची चिंता असते ना ही सोने जपून ठेवण्याची चिंता.
टॅग्स :GoldसोनंReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकMONEYपैसा