शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बोंडलामधील जैवविविधता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 7:45 PM

1 / 5
गोवा राज्यात जैवविविधता मोठया प्रमाणात आढळते.राज्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेले बोंडला हे त्याला अपवाद नाही. बोंडला अभयारण्य विविध प्रकारच्या ‘फ्लोरा आणि फाउना‘ने संपन्न आहे. या प्राणी संग्रहालयात बिबटे, अस्वल, गवा रेडा, पाणघोडा, चितळ असे वन्य प्राणी पहावयास मिळतातच परंतु प्राणी संग्रहालयाच्या बाहेरही अनेक प्रकारचे पशू पक्षी दृष्टीस पडतात. बोंडला अभयारण्य परिसरात दिसणाऱ्या विविध प्रकारच्या पशू पक्ष्यांचा छायाचित्रातून घेतलेला आढावा. प्राणी संग्रहालयाबाहेर असलेल्या तळयात असणारया मगरींना दिलेल्या अन्नावर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असलेला वुली नेक्ड स्टॉर्क पक्षी. (सर्व छायाचित्रे : पिनाक कल्लोळी)
2 / 5
अभयारण्यात आढळणारा शेकरु अर्थात मलबार जायंट स्क्वीरल.
3 / 5
अभयारण्यात आढळणारा गार्डन लिझर्ड.
4 / 5
केवळ प्राणी संग्रहालयातच नाही तर बाहेरील परिसरातही चितळ दृष्टीस पडते.
5 / 5
अभयारण्यात आढळणारा रॉक आगामा लिझर्ड.
टॅग्स :goaगोवा