शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: घरात आता एकालाच मिळणार PM किसानचे पैसे; असे आहेत नवे नियम-अटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:17 IST
1 / 11पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 2 / 11पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मागच्या काळात एकाच कुटुंबात योजनेचा लाभ घेणारे दोन ते तीन शेतकरी होते. असे बरेच कुटुंब आढळले होते. 3 / 11आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधारकार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. 4 / 11वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी वर्ष २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर, इंजिनिअर आहेत जे आयकर भरतात, जे पेन्शनर आहेत, त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. 5 / 11आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार: मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरलेली कोणतीही व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्राप्त करण्यास पात्र राहणार नाही.6 / 11दोन वर्षांपूर्वी आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले होते. आयकर भरूनही योजनेचा लाभ घेतला असेल तर रक्मम वसूल केली जाईल.7 / 11पीएम किसानचे पैसे कधी येणार? १ पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत. त्यामुळे १९ व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.8 / 11केंद्र सरकार पुढील महिन्यात २ फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता जारी करू शकते. त्यासाठी आकड्यांची जमवाजमव सुरू असून, तालुकानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठवली असल्याची माहिती आहे.9 / 11शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८मध्ये करण्यात आली होती. 10 / 11योजनेचे १८ हप्ते आतापर्यंत देण्यात आले आहेत. १९व्या हप्त्याची प्रतीक्षा असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो मिळण्याची आशा लाभार्थी शेतकऱ्यांना आहे.11 / 11वारंवार केवायसी का ? पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात. योजनेचा लाभही मिळतो. मात्र, काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितले जाते. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुन्हा तीच कागदपत्रे पाठवावी लागतात.