७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:19 IST
1 / 12Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेच्या सर्वांत लोकप्रिय असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनने मोठा इतिहास घडवला आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. अल्पावधीत प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद या वंदे भारत ट्रेनला लाभला आहे. 2 / 12Indian Railway Vande Bharat Express Train Big Achievement: भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या या स्वदेशी सेमी-हाय-स्पीड ट्रेनने गेल्या सहा वर्षांत लाखो प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. लवकरच स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे म्हटले जात आहे.3 / 12Vande Bharat Express Train Set The History: वंदे भारत ट्रेनमुळे देशभरात कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि विकासासाठी एक नवीन गती निर्माण झाली आहे. वंदे भारत ट्रेनला भारतीय रेल्वेच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ओळखले जाते. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, वंदे भारत ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. परदेशातील काही देश वंदे भारत ट्रेन आयात करण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. 4 / 12Vande Bharat Express Trains Milestone For Indian Railway: फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनने भारतीय रेल्वेतील प्रवासाला एक नवीन आयाम दिला. भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या मते, गेल्या सहा वर्षांत ७.५ कोटींहून अधिक प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केला आहे. वंदे भारत ट्रेनबाबची प्रवाशांमधील क्रेझ, लोकप्रियतेचा आणि विश्वासाचा हा पुरावा आहे.5 / 12रेल्वे मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, २०१९ मध्ये एकच वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत होती. परंतु आता वंदे भारत ट्रेनच्या नेटवर्कचा विस्तार देशभरातील १६४ सेवांमध्ये झाला आहे. वंदे भारत ट्रेन भारतातील २७४ जिल्ह्यांना जोडत आहेत. प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला चालना मिळते, असेही म्हटले जात आहे. 6 / 12वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी वरदान ठरत आहेत. देशाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्रांना या ट्रेनने जोडले जात आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत विकसित केलेल्या वंदे भारत अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. स्वयंचलित प्लग दरवाजे, रोटेटिंग सीट, बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली आणि संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज यांचा समावेश आहे. या गोष्टी प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य देतात.7 / 12वंदे भारत धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडते. वंदे भारत एक्स्प्रेस देशातील धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्रांना जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दिल्ली-वाराणसी मार्गाने राजधानीला देशाच्या आध्यात्मिक शहराशी जोडून प्रवासी, भाविक आणि पर्यटकांना मोठे फायदे दिले आहेत. ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला श्रीनगर-श्री माता वैष्णोदेवी कटरा मार्ग जम्मू आणि काश्मीरमधील धार्मिक पर्यटन आणि प्रादेशिक विकासाला नवीन चालना देत आहे.8 / 12बेंगळुरू-हैदराबाद वंदे भारत हे आयटी व्यावसायिक आणि व्यावसायिक प्रवाशांचे पसंतीचे पर्याय बनले आहे. कारण ते देशातील दोन प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांमध्ये जलद आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटी प्रदान करते. रस्ते आणि हवाई प्रवासाच्या तुलनेत या गाड्या कमी कार्बन उत्सर्जन निर्माण करून पर्यावरण संरक्षणात योगदान देतात.9 / 12रेल्वे मंत्रालयाच्या मते, वंदे भारत ट्रेनमधून दरमहा लाखो प्रवासी प्रवास करतात. या ट्रेन व्यावसायिक प्रवाशांसाठी उत्पादकता वाढवतात, कुटुंबांसाठी आरामदायी प्रवास सुनिश्चित करतात. भाविक, पर्यटकांसाठी सन्मानजनक प्रवास सुनिश्चित करतात. 10 / 12प्रवाशांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे देशात जागतिक दर्जाच्या रेल्वे पायाभूत सुविधांची वाढती मागणी दिसून येते. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन, अमृत भारत एक्स्प्रेस आणि नमो भारत रॅपिड रेल यांसारख्या आधुनिक रेल्वे सेवांची लोकप्रियता वाढत आहे.11 / 12प्रस्तावित स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये लांब पल्ल्याचा रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी, अत्याधुनिक करण्याची क्षमता आहे. रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे की, वंदे भारत एक्सप्रेस ही आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे, जी देशाला वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक रेल्वे नेटवर्ककडे नेत आहे.12 / 12प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादामुळे देशभरातील अनेक वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवले जात आहे. सुरुवातीला ८ कोचच्या असलेल्या वंदे भारत ट्रेन आता १६ आणि २० कोचच्या केल्या जात आहेत. यामुळे अधिक प्रवासी यातून प्रवास करू शकणार आहेत. केवळ भारतीय नाही, तर परदेशातून येणाऱ्या पर्यटकांनाही वंदे भारत ट्रेनची भुरळ पडली आहे. याबाबत अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.