शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bageshwar Dham: भाजप-काँग्रेसच्या नेत्यांना बागेश्वर धामची भुरळ; गडकरी-कमलनाथांसह बडे नेते बाबांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:12 IST

1 / 8
Bageshwar Dham News : या वर्षी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप आणि काँग्रेस निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या सगळ्यामध्ये मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा चर्चेत आले आहेत. काँग्रेस असो वा भाजप, दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीत उतरत आहे.
2 / 8
भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी अनेकदा धीरेंद्र शास्त्रींची भेट घेतलीच आहे, पण आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही सोमवारी बागेश्वर धाम गाठून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली. त्यापूर्वी रविवारी माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या मुलासारखे असल्याचे म्हटले होते.
3 / 8
यामुळे धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले-मध्य प्रदेशातील छतरपूर येथे बागेश्वर धाम मंदिर आहे. मंदिराचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यावर्षी जानेवारीपासून चर्चेत आहेत. त्यांनी जानेवारी महिन्यात नागपुरात कथा आयोजित केली होती. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादूटोण्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले. या वादानंतरही त्यांच्या कार्यक्रमांना अधिकच गर्दी जमू लागली आहे.
4 / 8
बागेश्वर धाममध्ये धर्म महाकुंभ सुरू-13 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत बागेश्वर धाम येथे धर्म महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारपासूनच भाविकांनी येथे गर्दी केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देशभरातील प्रसिद्ध बाबा आणि कथाकार पोहोचत आहेत. यातच राजकीय पक्षांचे नेतेही येणे अपेक्षित आहे. 13 ते 18 फेब्रुवारीदरम्यान होणारा हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य होणार आहे. 18 फेब्रुवारीला 121 मुलींचा विवाहही धामतर्फे होणार आहे.
5 / 8
धीरेंद्र शास्त्री दैवी चमत्कारी न्यायालयाचे आयोजन करतात, लोकांच्या समस्या सोडवण्याचा त्यांचा दावा आहे. एवढेच नाही तर त्यांचे भक्त त्यांना त्यांची समस्या सांगतात, तेव्हा धीरेंद्र शास्त्री ते कागदावर आधीच समाधान लिहितात. जिथे धीरेंद्र शास्त्रींचे समर्थक याला चमत्कार म्हणतात, तिथे विरोधक अंधश्रद्धा म्हणतात. एवढे करुनही लाखो भाविक धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात पोहोचतात.
6 / 8
कमलनाथही धीरेंद्र शास्त्रींच्या 'आश्रया'मध्ये- बागेश्वर धामकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला कठीण जात होते, कारण धीरेंद्र शास्त्री सनातनचा चेहरा बनत आहेत. यापूर्वी झालेल्या वादानंतर धीरेंद्र शास्त्री यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या राज्यात बागेश्वर धामकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला अवघड जात होते. धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात सत्ताधारी पक्षातील अनेक नेते सहभागी होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे काँग्रेस यातून मागे कशी राहणार? कमलनाथ यांनी सोमवारी कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी बागेश्वर धाम गाठून धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली.
7 / 8
उमा भारती समर्थनार्थ पुढे आल्या- भाजप नेत्या उमा भारती यांनी धीरेंद्र शास्त्री यांना पाठिंबा दिला आहे. उमा भारती यांनी ट्विट केले की, 'मी धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम) यांना पुत्र मानते, मी त्यांचा आदर करते आणि ते आमच्या क्षेत्राची शान आहेत.' याआधी मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री महेंद्र सिसोदिया यांनी धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थन केले आणि म्हणाले, सनातन धर्माला लक्ष्य करणे ही देशात फॅशन झाली आहे, याचे उदाहरण म्हणजे पंडित धीरेंद्र शास्त्री.
8 / 8
बडे नेतेही धीरेंद्र शास्त्रीपुढे नतमस्तक होतात- बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासमोर काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते नतमस्तक होतात. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेण्यासाठी नागपुरात पोहोचले होते. इतकेच नाही तर खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दतियामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा यात सहभाग होता.
टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश