कौतुकास्पद! आई-वडिलांचा भक्कम पाठींबा; इंजिनीअर लेक कोचिंगशिवाय झाली IPS
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 16:01 IST
1 / 12UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं आव्हानात्मक आहे. त्यासाठी सतत मेहनत आणि अभ्यास आवश्यक आहे. मोठ्या संख्येने उमेदवार त्यासाठी अर्ज करतात पण काही निवडकच IAS, IPS किंवा IFS अधिकारी होण्यात यशस्वी होतात.2 / 12आयपीएस अधिकारी अंशिका वर्मा यांची सक्सेस स्टोरी आता समोर आली आहे. दुसऱ्या प्रयत्नात तिने कोचिंगशिवाय यूपीएससी उत्तीर्ण केली. IPS अंशिका वर्मा या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहेत.3 / 12अंशिकाने 2020 मध्ये तिच्या दुसऱ्या प्रयत्नात कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय UPSC परीक्षा पास केली. 2019 मध्ये तिने परीक्षेचा पहिला प्रयत्न केला होता, तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर फक्त एक वर्ष झाले होते. 4 / 12अंशिकाने आपले प्राथमिक शिक्षण नोएडा येथे केले. 2014 ते 2018 पर्यंत नोएडा येथील गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी घेतली.5 / 12अंशिकाचा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या दिशेने प्रवास उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सुरू झाला. येथे तिने तयारीसाठी स्वतःला झोकून दिले. खूप मेहनत केली आणि तिला यश मिळालं. 6 / 12सर्व आव्हानांवर मात करत अंशिका वर्माने तिच्या दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षेत 136 रँक मिळवला आणि हे सर्व कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तिने करून दाखवलं. 7 / 12अंशिकाला तिच्या आईवडिलांनी भक्कम पाठींबा दिला. ते नेहमीच तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, ज्यामुळे ती हे यश संपादन करू शकली आहे. अनेकांना तिच्यापासून प्रेरणा मिळाली आहे. 8 / 12अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेड (UPEL) चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी आहे. मुलीच्या यशात दोन्ही पालकांच्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 12अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेड (UPEL) चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी आहे. मुलीच्या यशात दोन्ही पालकांच्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 12अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेड (UPEL) चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी आहे. मुलीच्या यशात दोन्ही पालकांच्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 12अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेड (UPEL) चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी आहे. मुलीच्या यशात दोन्ही पालकांच्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 12अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेड (UPEL) चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी आहे. मुलीच्या यशात दोन्ही पालकांच्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.