शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...आणि मैदानात अचानक उडू लागल्या पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 8:49 AM

1 / 8
भ्रष्टाचारावर प्रहार करण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ऐतिहासिक नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हाच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. दरम्यान, या नोटाबंदीला चार वर्षे उलटत आली तरी चलनातून बाद झालेल्या पाचशे हजाराच्या जुन्या नोटा सापडून येत असतात.
2 / 8
दरम्यान, केरळमधील पल्लकड येथील कोट्टायमध्ये मैदानात खेळत असताना काही मुलांना ५०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
3 / 8
या प्रकाराची खबर या मुलांनी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तपासामध्ये या नोटा ८० वर्षांच्या वृद्ध महिलेच्या असल्याचे निष्पन्न झाला. या महिलेने आपल्या जवळील नोटा ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा पावसात भिजल्याने वाळत घातल्या होत्या.
4 / 8
घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी सदर वृद्ध महिलेच्या घराची झडती घेतल्यानंतर सदर महिला ही घरात एकटीच राहत असल्याचे तसेच तिच्या नातेवाईकाशी तिचा काहीच संपर्क नसल्याचे समोर आले आहे. तसेच एकटी राहणारी ही महिला कुणालाही आपल्या खोतील येऊ देत नसल्याचे समोर आले आहे.
5 / 8
सदर महिलेने आपल्याकडील पैसे एका गोणीत भरून ठेवल्या होत्या. पावसामुळे ही गोणी भिजल्याने या नोटा ओल्या झाल्या होत्या. त्यामुळे या नोटा तिने मैदानात वाळत घातल्या होत्या. दरम्यान, या नोटा वाळत घातल्या असतानाच त्या नोटा खेळणाऱ्या मुलांच्या नजरेत पडल्या होत्या. या नोटांमध्ये पाच, दहा रुपयांच्या नोटांता समावेश होता. तसेच काही नाणी आणि चलनातून बाद झालेल्या नोटाही होता.
6 / 8
या वृद्ध महिलेने साठवलेल्या पैशांमध्ये सुमारे ३० हजार रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. थथा नावाच्या या वृद्ध महिलेने याबाबत सांगितले की, २०१६ च्या नोटाबंदीबाबत तिला काहीच माहिती नव्हती.
7 / 8
तर तपास करणारे अधिकारी म्हणाले की, या महिलेने मेहनत करून हे पैसे कमावले होते. ते तिचे स्वत:चे पैसे होते. तिने मोलमजुरी करून, भंगार विकून ही कमाई केली होती.
8 / 8
या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, थथा नावाच्या या महिलेला २०१६ साली झालेल्या नोटाबंदीबाबत काहीच माहिती नव्हती. तिच्याकडे बँकेचे खाते होते. मात्र त्याचा तिने अनेक वर्षे वापरच केलेला नव्हता. ती आपल्याकडे साठलेला पैसा घरातच साठवून ठेवत असे. तसेच तिच्या नातेवाईकांनाही तिच्याकडे असलेल्या पैशांबाबत काहीच माहिती नव्हती. दरम्यान, आता या महिलेला जेव्हा गरज असेल तेव्हा आर्थिक मदत करण्याचे आश्वासन स्थानिक नेत्यांनी दिले आहे.
टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणKeralaकेरळ