भारताची पाचही बोटे तुपात! आता मेघालयात खजिना सापडला; जगभरात सगळीकडेच तुफान मागणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:38 IST
1 / 6तांब्याचा शोध घेता घेता ओडिशामध्ये सोन्याचा मोठा सापडला होता. तीन जिल्ह्यांत हा साठा विस्तारलेला आहे. संशोधकांना आणखी काही जिल्ह्यांत हा साठा विखुरला असल्याचे वाटत आहे. यामुळे शोधाशोध सुरु असताना आणखी एक महत्वाची बातमी येऊन धडकली आहे. 2 / 6भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेला मेघालयातील काही जिल्ह्यांत आताच्या काळासाठी महत्वाचे खनिज सापडले आहे. हे एवढे विशाल भांडार आहे की सर्व मागणी पूर्ण करता येणार आहे. या भागात मध्यम गुणवत्तेचे बॉक्साईट सापडले आहे. तसेच उच्च गुणवत्तेचे लिथिअम व चुनखडक सापडले आहे. 3 / 6या साठ्यामुळे देशातील अॅल्यूमिनिअम, सीमेंट आणि स्वच्छ उर्जेच्या उद्योगांची मोठी मागणी पूर्ण होणार आहे. पश्चिम खासी हिल्सच्या रिमराई भागात बॉक्साईट साठे सापडले आहेत. गारो हिल्स परिसरात बॉक्साईटचे साठे आहेत. यामुळे राज्याची अॅल्युमिनियम उत्पादन क्षमता आणखी वाढणार आहे. 4 / 6पूर्व जैंतिया हिल्समध्ये २९ चुनखडीचे ब्लॉक सापडले आहेत. यामध्ये ५६६.०४ दशलक्ष टन साठा आहे. चेरापुंजीमध्ये देखील ७१.७८ दशलक्ष टन खनिज आहे. या राज्याचा चुनखडीचा साठा हा आता ५७३७.८२ दशलक्ष टन एवढा झाला आहे. 5 / 6सर्वाधिक पाऊस पडत असल्याचे ठिकाण असलेल्या चेरापुंजीमध्येच लिथिअम आयनचे साठे सापडले आहेत. हे लिथिअम बॅटरी निर्मिती आणि अॅल्युमिनिअम लिथिअम मिश्र धातूच्या उत्पादनासाठी वापरले जाऊ शकते. 6 / 6सोन्याचा साठा सापडलेला असतानाच जग आता ज्यासाठी व्याकूळ झाले आहे तो लिथिअमचा साठा सापडल्याने चीनची चांगलीच जिरणार आहे. कारण जगातील सध्याच्या घडीला लिथिअम आयनचा सर्वात मोठा पुरवठादार हा चीन आहे. आणि भारताला स्वत:ची गरज या साठ्याद्वारे भागविता येणार आहे. जम्मू काश्मीरमध्येही काही मौल्यवान खनिजांचे साठे सापडले आहेत.