शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:36 IST

1 / 10
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचं विमान टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकले. या भीषण दुर्घटनेत विमानातील एक प्रवासी वगळता सगळेच मृत्युमुखी पडले. हा अपघात नेमका कसा घडला याचे चौकशी करण्यासाठी सरकारने समिती नेमली होती.
2 / 10
एअर इंडियाच्या या विमान अपघाताबाबत AAIB(Aircraft Accident Investigation Burear) ने १५ पानी रिपोर्ट समोर आणला आहे. या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे आहेत. रिपोर्टनुसार AI 171 फ्लाईटमध्ये दुर्घटनेपूर्वी अखेरच्या ९८ सेकंदाची संपूर्ण घटना सविस्तर सांगितली आहे.
3 / 10
गुजरातच्या अहमदाबादहून एअर इंडियाचे हे विमान लंडनला जाणार होते. त्याआधी या विमानाने दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला. अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात विमानाचा अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर केवळ एकमेव प्रवासी सुखरुप बचावला.
4 / 10
AI171 एअर इडिया फ्लाईटने दुपारी १.३७ मिनिटांनी उड्डाणाची परवानगी मिळाल्यानंतर टेकऑफ घेतले. त्यानंतर बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर हे विमान केवळ ३२ सेकंद हवेत राहिले त्यानंतर ते क्रॅश झाले. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार १.३८ मिनिटांपर्यंत एका इंजिनाचा स्पीड टेकऑफ वेळी २८४ किमी प्रतितास इतका झाला होता.
5 / 10
पुढच्या २ सेकंदात विमानाने रोटेशन स्पीड घेतले जे २८७ किमी प्रतितास इतके होते. त्यानंतरच्या ४ सेकंदात विमान जमिनीवरून हवेत उडाले. अपघातानंतर समोर आलेल्या रिपोर्टमध्ये टेकऑफच्या प्रत्येक सेकंदाची माहिती समोर आली आहे. ज्यावेळी हे विमान हवेत जात होते तेव्हा विमानाचा वेग ३३४ किमी प्रतितास इतका होता.
6 / 10
विमान हवेत उड्डाण घेतल्यानंतर अचानक विमानाचे इंजिन बंद पडले. त्यानंतर विमानाने संतुलन बिघडले. आपत्कालीन स्थितीत एल्टीट्यूड म्हणजे RAT(Ram Air Turbine) चा वापर करण्यात आला. जेव्हा एखाद्या विमानाचे इंजिन बिघडते तेव्हा RAT चा वापर केला जातो.
7 / 10
वैमानिक तज्ज्ञानुसार, जेव्हा विमान उड्डाणाचा स्तर खाली येतो तेव्हा RAT सुरू केले जाते. जेणेकरून विमानाला आवश्यक उंचीपर्यंत नेता येईल. इंजिन फेल होणे अथवा हायड्रोलिक सिस्टमने काम करणे बंद करणे त्यावेळी पायलट याचा वापर करतात.
8 / 10
५.४७ UTC - विमान दिल्लीहून अहमदाबादला पोहचले. ६.४० UTC - तांत्रिक तपासणीनंतर उड्डाणासाठी विमानाला रिलीज करण्यात आले. ६.२५ UTC - क्रू का बेथ एनालाइजर टेस्ट झाले. सर्वकाही फिट होते. ७.०५ UTC(12.35 IST) क्रू सीसीटीव्हीत बोर्डिंग गेटवर पोहचताना दिसतात.
9 / 10
७.४८.३८ UTC - विमान Bay 34 साठी रवाना होते. ७.५५.३८ UTC - टॅक्सी क्लियरेंस मिळते, ७.५६.०८ UTC - टॅक्सी सुरू होते. ८.०७.३३ UTC - टेकऑफसाठी क्लियरेंस मिळते, ८.०७.३७ UTC - विमान टेकऑफ रोल सुरू करते, ८.०८.३३ UTC - V1 गती (१५३ नॉट आयएएस) ने गाठली, ८.०८.३५ UTC - व्हीआर स्पीड (१५५ नॉट्स) गाठला.
10 / 10
८.०८.३९ UTC - विमानाने जमीन सोडले, ८.०.४२ UTC - कमाल स्पीड १८० KtS IAS रेकॉर्ड केले गेले. त्यानंतर इंजिन १ आणि २ चे फ्ल्यूल कटऑफ स्विच मोड सुरू करण्यात आला. ८.०८.४७ UTC - विमानातील RAT सुरू झाला. ८.०८.५२ UTC - पुन्हा एकदा इजिन १ फ्यूल कटऑफ स्विच RUN मोडवर टाकले. ८.०८.५४ UTC - APU इनलेट डोर ऑटो स्टार्ट लॉजिक उघडणे सुरू झाले. ८.०८.५६ UTC - इंजिन २ चे फ्यूल कटऑफ स्विच पुन्हा RUN मोडवर टाकण्यात आले. ८.०९.०५ UTC (१.३९ वाजता) - पायलटकडून MayDay कॉल दिला गेला. ८.०९.११ UTC - EAFR रेकॉर्डिंग बंद झाले आणि विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAccidentअपघात