By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 16:49 IST
1 / 67 सप्टेंबर 1963 साली निरजाने पंजाबमधील चंढीगड येथे जन्म घेतला होता, जे नाव आज अजरामर झाले आहे.2 / 6बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर निरजाने मॉडेलिंगचेही काम केले. अमूल कंपनीच्या एका अॅडमध्येही निरजा भानौत झळकल्या होत्या.3 / 6नीरजाचे वैवाहिक जीवन अतिशय कठिण राहिले होते, हुंड्यासाठी तिलाही सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यात आला होता4 / 6निरजाने एअरहोस्टेस बनण्याचे ठरविल्यानंतर तिची आई खूप काळजीत असे, तर अँटी हायजॅकिंगचे ट्रेनिक देण्यात येईल हे समजल्यावर तिच्या वडिलांनीही नोकरी न करण्याचा सल्ला दिला होता.5 / 6जर प्रत्येकाच्या आईने असाच विचार केला तर देशाचे भविष्य काय होईल, असे म्हणत निरजाने हवाई सुंदरी होण्याचा निर्णय घेतला.6 / 6रमा आणि हरीश भनौत यांची निरजा लाडकी लेक होती, तर अखिल भनौत आणि अनिश भनौत यांचीही लाडकी बहिणी होती. जिने विमान अपहरणात देशासाठी आपले प्राण गमावले