शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक-दोन नव्हे, सात मार्गांवर बुलेट ट्रेन धावणार?; मोदी सरकारची तयारी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 4:34 PM

1 / 11
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरनंतर आता मोदी सरकारनं आणखी सात नव्या कॉरिडॉरसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचएसआरसीएल) प्रस्ताव दिला आहे.
2 / 11
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. तर नव्या सात कॉरिडॉरच्या माध्यमातून ५ हजार किलोमीटरवर बुलेट ट्रेन धावेल.
3 / 11
प्रस्तावित सात नव्या मार्गांचा आढावा घेण्याचं काम रेल्वे मंत्रालयानं एका एजन्सीला सोपवल्याची माहिती एनएचएसआरसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
4 / 11
रेल्वे मंत्रालयानं एनएचएसआरसीएलला दिलेल्या सात बुलेट मार्गिकांची माहिती आकडेवारीसह एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितली.
5 / 11
दिल्ली-वाराणसी (८६५ किलोमीटर), मुंबई-नागपूर (७५३ किलोमीटर), दिल्ली-अहमदाबाद (८८६ किलोमीटर), चेन्नई-म्हैसूर (४३५ किलोमीटर), दिल्ली-अमृतसर (४५९ किलोमीटर), मुंबई-हैदराबाद (७११ किलोमीटर) आणि वाराणसी-हावडा (७६० किलोमीटर) या मार्गांवर बुलेट ट्रेन चालवण्यात येतील.
6 / 11
बुलेट ट्रेनच्या सात मार्गिकांसाठी विस्तृत अहवाल तयार करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
7 / 11
सात नव्या मार्गांवर बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्यासाठी एनएचएसआरसीएलनं त्या भागांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
8 / 11
एनएचएसआरसीएलकडून सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हाय स्पीड योजनेवर काम सुरू आहे.
9 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी १७ अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे.
10 / 11
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हाय स्पीड योजनेसाठी जपान आंतरराष्ट्रीय सहाय्य संस्था (जेआयसीए) आणि रेल्वे मंत्रालयानं सामंजस्य करार केला आहे.
11 / 11
या प्रकल्पासाठी एकूण १ हजार ३८० हेक्टर जमीन आवश्यक आहे. यापैकी ५९८ हेक्टर जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. पैकी ४७९ हेक्टर जमीन जमीन मालकांकडून, तर ११९ हेक्टर सरकारकडून ताब्यात घेण्यात आली आहे.
टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra hillनरेंद्र डोंगर