शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

६ वि. ४! महुआ मोईत्रांच्या विरोधात कोणी मतदान केले? एका मताचा अमरिंदर सिंगांशी थेट संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:35 AM

1 / 7
तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. लोकसभेच्या एथिक्स कमिटीच्या अहवालाला काल ६-४ ने मंजुरी मिळाली असून यामध्ये मोईत्रांच्या विरोधात गेलेले एक मत त्यांच्यासाठी धक्कादायक होते. आता आज हा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सोपविला जाणार आहे, यानुसार मोईत्रांविरोधात कारवाई होणार आहे.
2 / 7
लोकसभेच्या एथिक्स कमिटीमध्ये एकूण १५ सदस्य आहेत. त्यापैकी १० सदस्यांनी कालच्या बैठकीत मतदान केले. या सदस्यांमध्ये भाजपाचे सात, काँग्रेसचे तीन, बसपा, शिवसेना, वायएसआर काँग्रेस, सीपीएम आणि जदयूचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. भाजपाचे खासदार विनोदकुमार सोनकर हे अध्यक्ष आहेत. महुआ यांच्याविरोधातील प्रस्तावावर सहा सदस्यांनी मतदान केले.
3 / 7
एथिक्स समितीच्या मतदानावेळी काँग्रेसचे तीनपैकी दोन सदस्य हजर होते. यापैकी एका सदस्याने अहवालाच्या बाजुने मतदान केले. काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी अहवालाच्या बाजूने मतदान केले. तर वैथिलिंगम यांनी अहवालाविरोधात मतदान केले.
4 / 7
परनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाने पक्षातून निलंबित केले आहे.
5 / 7
परनीत कौर (काँग्रेस), विनोद सोनकर (BJP), अपराजिता सारंगी (BJP), सुमेधानंद सरस्वती (BJP), राजदीप रॉय (BJP), हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) यांनी अहवालाच्या बाजुने मतदान केले. तर दानिश अली (BSP), पीआर नटराजन (CPM), गिरधारी यादव (JDU) आणि वैथिलिंगम (काँग्रेस) यांनी अहवालाविरोधात मतदान केले.
6 / 7
विरोध करणाऱ्या विरोधी खासदारांनी समितीची शिफारस पूर्वग्रहावर आधारित आणि चुकीची असल्याचे सांगितले. समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर आणि भाजप खासदारांनी मोईत्रा प्रकरणातील समितीच्या कार्यवाहीची माहिती माध्यमांना लीक केल्याचा आरोप बसपा खासदार अली यांनी केला. तसेच हे देखील नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
7 / 7
तक्रारदार आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस खासदार परनीत कौर यांचे आभार मानले. पंजाब नेहमीच भारताची ओळख आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी उभा राहिला आहे. आज पुन्हा कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली नाही, असे ते म्हणाले.
टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राlok sabhaलोकसभाCaptain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंग