२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:13 IST
1 / 5 २०२५ हे वर्ष अर्धे संपले आहे. आता या वर्षाचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. दरम्यान, या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये जगभरात, युद्ध, हिंसाचार, दहशतवादी हल्ले, अपघात अशी संकटे; भूकंप, महापूर अशा नैसर्गिक आपत्ती आदींनी जगभरातील मानवजातीला त्रस्त करून सोडले आहे. मात्र आता २०२५ पेक्षा २०२६ हे वर्ष अधिक भयंकर असेल, अशी शक्यता वर्तवणारी भविष्यवाणी समोर आली आहे. 2 / 5भारतीय पंचांगानुसार सध्या विक्रम संवत २०८२ ह्या वर्षांतर्गत कालयुक्त सिद्धार्थ संवत्सर सुरू आहे. या संवत्सराबाबत जी भविष्यवाणी केली जात आहे त्यानुसान भारत आणि जगाला युद्ध, दहशतवादासह अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्याशिवाय दुष्काळ, पूर आणि भूकंपांसारख्या संकटांमुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक बनणार आहे. त्यानंतर जेव्हा पुढच्या वर्षी १९ मार्चपासून विक्रम संवत २०८३ ची सुरुवात होईल, तेव्हा ते रौद्र नावाचं संवत्सर असेल. 3 / 5या रौद्र संवत्सराच्या काळात देशासह जगभरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची शक्यता आहे. या काळात जागोजागी नरसंहार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तसेच भूकंप आणि ज्वालामुखींचा उद्रेक होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार संकटात येण्याची शक्यता आहे. 4 / 5ज्योतिषाच्या नजरेतून पाहिलं तर १२ जुलै ते १५ ऑगस्ट हा काळ अधिक भयंकर असण्याची शक्यता आहे. यादरम्यान, गुरू, चंद्र आणि सूर्य हे तिन्ही ग्रह कर्क राशीमध्ये असतील. त्यानंतर हे तिन्ही ग्रह पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील. ते शनीचं नक्षत्र आहे. या दरम्यानची ग्रहांची स्थिती एखादा मोठा महापूर आणू शकते. तसेच त्यामुळे अनेक ठिकाणी विध्वंस होऊ शकतो. 5 / 5शनी ग्रह सध्या मीन राशीमध्ये आहे. तसेत जून २०२७ मध्ये तो मीन राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर २०२९ पर्यंत शनी हा मेष राशीमध्येच राहील. ही स्थिती हवामानामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणू शकते. तसेच २०२६ मध्ये जागतिक महायुद्धासारखी समीकरणे आकारास येत आहेत. तर गुरू, मंगळ आणि राहू-केतूची स्थिती लोकांचं सुख-समाधान हिरावून घेऊ शकते. राहू जगात संभ्रम निर्माण करेल आणि जीवघेण्या साथींचा प्रकोप निर्माण करू शकतो. (टीप - वरील मजकूर हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. त्याला लोकमत.कॉम त्याला दुजोरा देत नाही)