१५,२५६ फुट उंच, जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान; Anand Mahindra म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 10:43 AM2022-11-13T10:43:29+5:302022-11-13T10:51:19+5:30

या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरताही भासते. तापमानही उणे ४० अंशांवर जाते.

ताशीगांग गाव समुद्रसपाटीपासून १५,२५६ फूट उंचीवर वसलेले आहे. वर्षातील सहा ते सात महिने त्या ठिकाणी बर्फच असतो.

या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरताही भासते. तापमानही उणे ४० अंशांवर जाते. येथे एकूण आठ ते दहा घरे आहेत. हे सुमारे अर्धा चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.

स्पिती उपविभागांतर्गत आदर्श मतदान केंद्र ताशीगांग येथे विधानसभा निवडणुकीसाठी प्रथमच 52 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हिमाचल प्रदेशच्या उंच भागात बर्फवृष्टीमुळे राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर बर्फाची चादर होती. ज्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना या भागात पोहोचणे आव्हानात्मक होते. एक फूट बर्फ आणि 14 किमीचा पायी प्रवास करत मतदान केंद्रावरी कर्मचारी भटोरी मतदान केंद्रावर पोहोचले.

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती जिल्ह्यातील ताशिगांग येथे जगातील सर्वात उंच मतदान केंद्र उभारले गेले. हे 15256 फूट उंचीवर आहे, जिथे 52 मतदार आहेत. 100 टक्के वोटर टर्न आऊटसाठी याला मॉडेल पोलिंग स्टेशन बनवण्यात आले होते.

इतकं कमी तापमान असलं तरी ज्येष्ठ नागरिकांचाही निवडणुकीत मतदान करण्याचा उत्साह कमी आलेला नव्हता. सर्वांनीच या ठिकाणी मतदानाचा आपला हक्क बजावला.

चांबा येथील 105 वर्षीय नरो देवी आणि शिमल्यात 103 वर्षीय सरदार प्यार सिंग यांसारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं. या राज्यात 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 1.21 लाख मतदार आहेत, त्यापैकी 1,136 मतदारांचं वय 100 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचे आनंद महिंद्रा यांनीदेखील इतक्या उंच ठिकाणी जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. हिमाचलमधील 12 हजार फूट उंचीवर असलेल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी निवडणूक अधिकारी 15 किमी बर्फात ट्रेकिंग करत आहेत. लोकशाहीबाबत ही कृती शब्दांपेक्षा खूप काही सांगून जाते, असं आनंद महिंद्रा म्हणाले.