ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सोनई येथील तिहेरी हत्याकांड खटल्याचा युक्तिवाद पूर्ण, शनिवारी सुनावणार शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:34 IST
1 / 4राज्यात गाजलेल्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला.2 / 4सुनावणीसाठी आरोपींना कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. अखेप न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत येत्या शनिवारी (दि.२०) या खटल्यामधील दोषींना शिक्षा सुनावली जाणार असल्याचे जाहीर केले.3 / 4सुनावणीसाठी न्यायालयाच्या आवारात खूप गर्दी झाली होती. 4 / 4संवेदनशील खटला असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.