शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी केलं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 9:42 PM

1 / 5
राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचे तीन वर्षांचे अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी काढलेली हल्लाबोल दिंडी पदयात्रा सोमवारी नागपूर शहराच्या हद्दीत दाखल झाली
2 / 5
राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार ‘अनुसूचित जमातीच्या’ अनुसूचीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन ‘येळकोट-येळकोट जयमल्हार’च्या निनादात धनगर युवक मंडळाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला.
3 / 5
विरोधी पक्ष आमदारांच्या नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ‘मोदी हाय हाय’ घोषणा देत हल्लाबोल केला.
4 / 5
नागपूर अधिवेशनाआधी झालेल्या रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आंदोलक रस्ता सोडण्यास तयार नव्हते
5 / 5
पोलिसांनी सुप्रिया सुळे यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेले माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार संदीप बजोरिया यांच्यासह १० पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे कार्यकर्ते भडकले. तणाव निर्माण झाल्याने काही वेळांनी पोलिसांनी नेत्यांना सोडून दिले.
टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७