By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 15:21 IST
1 / 8मारबत महोत्सव... रोगराई, संकटे, दुष्काळ, बेकारी, भ्रष्टाचार अशा समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी निघत असलेली मारबत व बडग्याची मिरवणूक नागपुरात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात निघाली. 2 / 8नागपुरात मारबत महोत्सव जो इंग्रजांविरोधातील प्रतिकात्मक क्रांतीचे द्योतक आहे. 3 / 8येथील भोसले राजघराण्यातील एका वंशजाने राजद्रोह करत कपटी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. त्याचा निषेध म्हणून मारबत महोत्सव आकाराला आला. 4 / 8मात्र, त्या काळात इंग्रजी राजवटीशी उघड उघड संघर्ष करणे शक्य नसल्याने, महाभारतातील श्रीकृष्ण व राक्षशिण पुतना मावशीच्या कथेशी सांगड घालत लोकसंग्रहातून संघर्षाला खतपाणी घालण्यासाठी या महोत्सवाची योजना आखण्यात आली. तेव्हापासून सलग 140 वर्षे हा महोत्सव तेवढ्याच जल्लोषात साजरा होत आहे.5 / 8या महोत्सव हजारो लोकांच्या एकत्रिकरणातून ‘इडा पिडा टळो, माशि मोंगसे घेऊन जा गे मारबत’ असा जल्लोष केला जातो. 6 / 8या दोन प्रमुख मारबतींसोबतच अन्य आठ मारबती या महोत्सवात सहभागी असतात. 7 / 8या मारबत महोत्सवामध्येच देश आणि जगपातळीवर असणाऱ्या प्रमुख समस्यांना प्रतिकात्मक पद्धतीने घेऊन बडगेही सादर होत असतात. 8 / 8यंदा या महोत्सवात 21 बडगे सहभागी होणार असून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, काश्मीर प्रकरणातील कलम 370, महागाई, राष्ट्रीय स्तरावरील राजनेते आणि अन्य प्रश्नांवर हे बडगे सांकेतिकरीत्या भाष्य करत होते.