By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 17:58 IST
1 / 10नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्विट करुन आपले अधिकारी, स्थलांतरीत आणि गरजू नागरिकांची निवास कक्षात जाऊन कशारितीने काळजी घेतात, हे सांगितलंय. कोरोना प्रादुर्भानंतर स्थलांतर झालेल्या नागरिकांसाठी आम्ही तत्पर आहोत, हेच मुंढेंनी दाखवून दिलंय.2 / 10एएनआय या वृत्तसंस्थेने नागपूर हद्दीत स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या गैरसोयीबद्दल वृत्त प्रकाशित केले होते. मात्र, हे वृत्त चुकीचे असल्याचे मुंढे यांनी म्हटलंय. 3 / 10तसेच, याबाबत खुलासा करताना वस्तुस्थितीही मुंढे यांनी ट्विटरवरुन सांगितलीय. हे नागरिक दुसऱ्या राज्यातील असून ते गावी परतत होते. मात्र, त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था महापालिकेने केल्याचे मुंढे यांनी म्हटलंय.4 / 10महापालिका आणि जिल्हा परिषदेती सरकारी अधिकारी स्थलांतरीत नागरिकांच्या निवास कक्षात जाऊन आवर्जुन त्याांची विचारपूस करत आहेत. 5 / 10सध्या नागपूर महापालिकेच्या नियंत्रित निवास कक्षात असलेले सर्व स्थलांतरीत भोजन आणि इतर सोयी सुविधांबद्दल आनंदी व समाधानी आहेत. 6 / 10तुकाराम मुंढे यांनी ट्विट करुन एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेली बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केलं होतं. 7 / 10नागपूरमधील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रशासन स्थलांतरीतांच्या भोजनाची आणि निवासाची पूर्णपणे काळजी घेत आहे. 8 / 10निराधार आणि बेघर नागपूरकरांनाही महापालिकेनं निवारा दिला आहे, तसेच त्यांच्या पोटाची भूक भागविण्याचंही काम केलं आहे. 9 / 10डिजिटल युगात वावरताना, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागपूर महापालिकेनं एक एप डेव्हलप केलं असून त्याद्वारे नागरिकांपर्यंत ते सातत्याने पोहोचत आहेत. तसेच सूचना आणि मार्गदर्शनही करण्यात येत आहे. 10 / 10महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. विदेशातून आणि इतर राज्यातून आलेल्या नागरिकांची विचारपूस करुन काळजी घेण्यात येत आहे.