म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:12 IST
1 / 10पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. यामुळे एकेकाळचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले. 2 / 10नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. आता दोन्ही सिंग ट्रेंडिंगमध्ये आहेत. परंतू याचा त्रास एका फुटबॉल प्लेअरला सहन करावा लागत आहे. 3 / 10अमरिंदर सिंग असे त्याचे नाव असल्याने त्याला टॅग करून लोक ट्विट करू लागले आहेत. विशेष म्हणजे हा अरमिंदर सिंग भारतीय फूटबॉल संघाचा गोलकिपर आहे. 4 / 10राजकारणात आहे तो अमरिंदर कोण हेच लोकांना कळत नसल्याने @ नंतर अमरिंदर टाकले की लोक त्यालाही टॅग करू लागले आहेत. यामुळे वैतागलेल्या अमरिंदरने लोकांसमोर हात जोडले आहेत. 5 / 10हा खेळाडू भारतीय फुटबॉल टीमचा गोलकिपर अमरिंदर सिंग आहे. या अमरिंदरला मीडिया हाऊसदेखील टॅग करत आहेत. यामुळे वैतागलेल्या अमरिंदरने ट्विट केले आहे. 6 / 10'मी अमरिंदर सिंग आहे, भारतीय फुटबॉल टीमचा गोलकीपर. पंजाबचा मुख्यमंत्री नाही. न्यूज मीडिया पत्रकारांनी मला टॅग करणे बंद करावे,' असे आवाहन केले आहे. 7 / 10अमरिंदर सिंगचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमरिंदर सिंगांच्या या ट्विटनंतर माजी मुख्यमंत्री आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्याचे ट्वि रिट्विट केले आहे. 8 / 10अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमधून फुटबॉलपटू अमरिंदर सिंग यांस दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या तरुण मित्रा, माझी तुला पूर्ण सहानुभूती आहे. तुझ्या खेळासाठी माझ्याकडून शुभेच्छा... असे कॅप्टन अमरिंदर यांनी म्हटलंय. 9 / 10अमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. 10 / 10खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते. परंतू तेवढ्यातच सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने एक दिवस उशिरा शाहांची भेट घेण्याचा निर्णय कॅप्टननी घेतला.