महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 01:11 IST
1 / 5मतदार याद्यांमधील घोळ आणि बोगस मतदारांवरून होत असलेल्या आरोपांमुळे केंद्रीय निवडणूक आयोग वादात सापडला आहे. अशातच आयोगाने साफसफाईची मोहीम हाती घेतली असून, पहिली कुऱ्हाड राजकीय पक्षांवरच चालवली आहे. 2 / 5होय, केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील तब्बल ३३४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून वगळले आहे. यात महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे. 3 / 5देशातील ३३४ राजकीय पक्षांना निवडणूक यादीत वगळण्याचे कारण म्हणजे कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होणं. ज्या पक्षांनी मागील सहा वर्षात कोणत्याच निवडणुकीत सहभाग घेतला नाही, त्यांचा यात समावे आहे. 4 / 5त्याचबरोबर ज्या पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली. नोंदणी करताना त्यांनी जो पत्ता दिला आहे, तो अस्तित्वातच नाही, अशा राजकीय पक्षांचाही यामध्ये समावेश आहे. यामध्ये अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद यांचा समावेश आहे. 5 / 5इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पिपल्स गार्डियन, दि लोक पार्टी ऑफ इंडिया, युवा शक्ती संघटना अशी या नऊ राजकीय पक्षांची नावे आहेत.