Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 22:44 IST
1 / 4महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे ठाकरे बंधू – शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे – पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.2 / 4राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नी आणि कुटुंबासोबत राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले.3 / 4राजकीय मतभेद बाजूला ठेवून, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी यावेळी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला.4 / 4गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही कुटुंबांमधील वैयक्तिक भेटीगाठी वाढल्या आहेत, अशात आदित्य आणि अमित यांनी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचा एकत्र फोटो दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि मराठी भाषिक नागरिकांसाठी अत्यंत सकारात्मक संदेश देणारा ठरला.