शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बायकोशी बोलतोय असं भासवून अरविंद सावंतांशी बोललो; 'त्या' कारमध्ये कोण कोण होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 4:35 PM

1 / 10
महाराष्ट्रात गेल्या जून महिन्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेसह संपूर्ण महाविकास आघाडी त्या भूकंपाने हादरली. या बंडाचा परिणाम असा झाला की, सर्व प्रयत्न करूनही महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पडले.
2 / 10
या संपूर्ण बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणते मंत्री, कोणते आमदार कारमध्ये होते. एकनाथ शिंदे यांच्या मनात काय चालले होते? असे अनेक प्रश्न राजकारणात रस असलेल्या लोकांच्या मनात होते. ज्याचे उत्तर उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिले आहे.
3 / 10
खरे तर ज्या दिवशी एकनाथ शिंदे बंड करून सुरतला गेले, त्या दिवशी नितीन देशमुख त्यांच्या कारमध्येच होते. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत नितीन देशमुख यांनी बंडाच्या घटनाक्रमाचे वर्णन केले आहे.
4 / 10
नितीन देशमुख यांनी सांगितले की, त्या दिवशी विधानपरिषद निवडणुकीची वेळ होती. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला विधानभवनात सांगितले की, नितीन चल, आपण बंगल्यावर जाऊ. तेव्हा ते आमचे नेते आणि नगरविकास मंत्री होते. त्यामुळे त्यांना नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.
5 / 10
मी एकनाथ शिंदे यांच्या गाडीत बसलो. शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरचे आमदार आबिटकर हेही गाडीत होते. शिंदे यांच्यासोबत गाडीत त्यांच्या बंगल्यावर गेलो. संजय राठोड, संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर आले. मग मी बांगरला विचारले काही समस्या आहे का, तो म्हणाला नाही, असे काही नाही.
6 / 10
यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मला व कोल्हापूरचे आमदार आबिटकर यांना गाडीत बसवले आणि चला ठाण्याला जाऊ असे सांगितले. त्या दिवशी मला माझ्या मतदारसंघात परत जायचे होते. म्हणून मी माझ्या पीएला फोन करून बॅग आणायला सांगितली. मी ठाण्यात भेटतो म्हटलं पण आम्ही ठाण्यात गेलो नाही. ठाण्याऐवजी पालघरला गेलो.
7 / 10
पालघरमध्ये काहीतरी घडले असावे म्हणून आलो असावं असे वाटले. एका हॉटेलमध्ये गेलो. आम्ही तिथे चहा घेत होतो. तेवढ्यात दोन-तीन मंत्र्यांची वाहने तेथे आली. अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, शंभूराज देसाई यांची गाडी आली. मग मला वाटले की काहीतरी गडबड असावी.
8 / 10
यानंतर, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तिथे पान दुकानदाराला विचारले की हा रस्ता कुठे जातो. त्याने सांगितले की हा रस्ता सुरतकडे जातो. सुरत येथून १०० किलोमीटर अंतरावर आहे. काहीतरी मोठी घडामोड घडणार असल्याचा अंदाज आला.
9 / 10
एवढे सगळे करूनही मी घाबरलो नाही आणि हार मानली नाही. मला वाटले आपण कुठे जातो याने काही फरक पडत नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. त्यानंतर मी गाडीत बसलो. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या आमदाराला दुसऱ्या गाडीत बसवले. मी एकनाथ शिंदे यांच्या गाडीत होतो. गाडीत शिंदे यांचे पीए प्रभाकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि मी होतो.
10 / 10
तेव्हा शिंदे यांनी उर्वरित आमदारांना फोन करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी अरविंद सावंत यांच्याशी माझ्या पत्नीशी बोलत असल्यासारखे बोललो. इथे काय चाललंय ते सांगितलं. शेवटी सुरतला पोहोचलो. त्याठिकाणी आमदारांना कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. त्यानंतर काय झाले हे सर्वांना माहीत आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNitin Deshmukhनितीन देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना