Suhas Kande : "माझं काय चुकलं?", आदित्य ठाकरेंना सुहास कांदेंचं थेट आव्हान; विचारले 'हे' 10 सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 10:29 AM2022-07-22T10:29:19+5:302022-07-22T11:11:21+5:30

Suhas Kande And Shivsena Aaditya Thackeray : "माझं काय चुकलं" या आशयाखाली मतदार संघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याचा पत्रात उल्लेख असणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. याच दरम्यान बंडखोर आमदार सुहास कांदे त्यांना एक निवेदन देणार आहेत.

सुहास कांदे यांचा मतदारसंघ असलेल्या मनमाडला आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 5 ते 6 हजार कार्यकर्ते घेऊन सुहास कांदे मनमाडला जाणार असून याबाबत अनेक होर्डिंग उभारण्यात आले आहेत.

"माझं काय चुकलं" या आशयाखाली मतदार संघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याचा पत्रात उल्लेख असणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

पालघरमधील साधू हत्याकांड, मालवणी येथील हिंदूच पलायन, स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यापसून शिवसेना दूर गेली यावर माझं काय चुकल असं म्हणत कांदेंनी 10 सवाल केले आहेत.

सुहास कांदे यांनी निवेदनात छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याची खंत देखील व्यक्त केली आहे.

साहेबांना जेलमध्ये टाकण्याची हिंमत करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला यातना होत नाहीत का आदित्य साहेब? असा सवाल देखील कांदे यांनी विचारला आहे.

निवेदन देण्याआगोदर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदेंनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल केले आहेत.

सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे.