शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० भूखंड खरेदी करण्यासाठी संजय राऊतांनी ३ कोटी रोख दिले? चौकशीत खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 3:57 PM

1 / 10
गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय राऊतांना ईडीने अटक केली असून ४ ऑगस्टपर्यंत विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे.
2 / 10
सूत्रांनुसार, पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याच्याकडून संजय राऊतांना ३ कोटी रुपये कॅश मिळाले होते. त्यातून राऊतांनी अलिबागच्या किहिम बीचजवळ १० प्लॉट जमीन विकत घेतल्याचं ईडीला संशय आहे.
3 / 10
राऊत यांनी हा व्यवहार रोखीने केला आहे. ईडीने सोमवारी ८ तासांच्या चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेतले आहे. ईडीने मंगळवारी राऊतांच्या निगडीत असलेल्या २ ठिकाणी छापेमारी केली. एचडीआयएल आणि प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊतांना रोख रक्कम मिळाली.
4 / 10
HDIL च्या माजी अकाऊंटंटशी ईडीने चौकशी केली. जो एचडीआयएलशी संबंधित रोख व्यवहाराची जबाबदारी होती. संजय राऊतांना मिळालेल्या रोखीची ईडी चौकशी करत आहे. प्रविण राऊत हा HDIL च्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच्या संचालकांपैकी एक होता.
5 / 10
संजय राऊत यांना एचडीआयएलकडून रोख रक्कम देण्याच्या सूचना मिळाल्या होत्या का? याचाही ईडी तपास करत आहे. पंजाब अँन्ड महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग यांच्या ठिकाणांचा शोध घेण्यात आला.
6 / 10
पत्रा चाळ फसवणुकीच्या व्यवहारातून मिळालेली रोख रक्कम राऊत यांच्याकडे वळवण्यात आली आणि अलिबागमधील प्लॉट खरेदी करण्यासाठी ३ कोटींहून अधिक रुपये वापरण्यात आल्याचा आरोप आहे.
7 / 10
ईडीने यापूर्वी या जमिनी जप्त केल्या होत्या. ईडीचे अधिकारी रोख व्यवहारांशी संबंधित लोकांची चौकशी करत आहेत. मध्य मुंबईतही फ्लॅट खरेदी केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. किहिममध्ये एक प्लॉट आणि अलिबागमध्ये १० प्लॉट जमीन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम दिली होती.
8 / 10
ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी कोर्टात सांगितले की, 'या जमिनी खरेदी करण्यासाठी सुमारे ६०-७० टक्के रक्कम रोख स्वरूपात दिली गेली. त्यामुळे संजय राऊत यांच्याबाबत ईडी आणखी कोठडीची मागणी करू शकते असं बोललं जात आहे.
9 / 10
गोरेगाव येथे एकूण ४७ एकर जागेवर असलेल्या पत्राचाळ पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. या कंपनीमध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत हे संचालक होते, तर याच कंपनीमध्ये राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांचीदेखील हिस्सेदारी होती.
10 / 10
पुनर्विकासाच्या कामातून तेथील ६७२ रहिवाशांना घरे देणे आणि तीन हजार फ्लॅटस् म्हाडाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने येथे पुनर्विकासाचे काम न करता ती जागा आणि त्यावरील चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) यांची आठ बिल्डरांना विक्री केली. या विक्रीतून या कंपनीला १,०३९ कोटी ७९ लाख रुपये मिळाले.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना