शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नववर्षारंभ शोभा यात्रांसंगे

By admin | Published: March 22, 2015 12:00 AM

1 / 13
नारीशक्तीचा प्रभाव...मोटारसायकल चालवण्यापासून ते ढोल पथकांपर्यंत महिला उत्साहाने पुढे होत्या. गिरगावमधील शोभायात्रेत ढोल वाजवण्यात रमलेली ही तरुणी.
2 / 13
शोभा यात्रेतून सामाजिक संदेश देण्याची परंपरा यंदाही कायम होती. डोंबिवलीतील स्वागत यात्रेत वॉट्स अ‍ॅप व फेसबुकच्या दुष्परिणामाकडे लक्ष वेधणारी चिमुकली.
3 / 13
गुढीपाडव्याचे आकर्षण ठरणा-या डोंबिवलीतील शोभा यात्रेत आबालवृद्ध पारंपारिक वेशात नटूनथटून सहभागी झाले होते.
4 / 13
अलिबागमधील शोभा यात्रेत चित्तथरारक कसरती सादर करताना तरुण.
5 / 13
शूर आम्ही सरदार... नवी मुंबईतील शोभायात्रेत शिवाजी महाराजांवरील आधारित चित्ररथ. शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषेतील ही लहान मुलं सर्वांच लक्ष वेधून घेत होती
6 / 13
आता मिशन कल्याण डोंबिवली...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण व डोंबिवलीमधील स्वागत यात्रेला हजेरी लावली. कल्याण - डोंबिवलीत आगामी काळात महापालिका निवडणूक होणार असून या महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणवार असा निर्धार फडणवीस यांनी केला असावा.
7 / 13
स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ रोवणा-या डोंबिवलीत शोभा यात्रेत महिलांचे झांज पथक.
8 / 13
प्रजासत्ताक दिनी राजपथावर अव्वल ठरलेले पंढरीची वारी हे चित्ररथ गिरगावमधील शोभा यात्रेच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
9 / 13
जुहू चौपाटीवर १०० फूट उंच गुढी उभारण्यात आली होती. ही गुढी यंदाचे वैशिष्ट्य ठरली होती.
10 / 13
गुढी पाडवा जल्लोषात साजरा व्हावा यासाठी बंदोबस्तावर असलेल्या या महिला पोलिसांनी स्वागत यात्रेची छबी मोबाईलमधील कॅमे-यात टिपली.
11 / 13
मुंबईतील गिरगाव येथील स्वागत यात्रेत मराठमोळ्या वेशातील या तरुणींनी दुचाकीवर चित्तथरारक कसरत करुन हम भी किसी से कम नही असा संदेश दिला.
12 / 13
पारंपारिक वेषात यात्रेत मोटारसायकलवरुन शोभा यात्रेत सहभागी झालेल्या या महिला. स्त्री शक्तीचे आधुनिक रुप या यात्रेत बघायला मिळाले.
13 / 13
गुढी पाडव्याला मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त राज्याच्या विविध भागांमध्ये स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता अभिषेक बच्चन व त्याची पत्नी ऐश्वर्या राय - बच्चन यांनी मुंबईतील स्वागत यात्रेत सहभागी होत उपस्थितांचा उत्साह वाढवला. राज्यातील शोभा यात्रांचा टाकलेली एक नजर