By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:50 IST
1 / 9मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याच्या २४ तारखेला दीड हजार रुपये खात्यावर जमा होतात; परंतु यंदा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असल्याने महिला दीड हजार रुपयांची वाट पाहत आहेत. 2 / 9मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहेत. महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. 3 / 9ज्या महिला टॅक्स भरतात, कार आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे; परंतु याबाबत अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. 4 / 9योजनेचे अर्ज स्वीकारण्यास १ जुलै २०२४ पासून सुरुवात झाली होती. सप्टेंबरअखेरपर्यंत योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. अर्ज भरण्यासाठी मोठा कालावधी मिळाल्याने लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.5 / 9विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. 6 / 9अनेक महिला या योजनेसाठी पात्र नसतानाही त्यांनी आपले अर्ज भरून लाभ घेतला होता. आता अर्जाची छाननी सुरू झाली आहे. अपात्र महिलांची नावे अद्याप समोर आली नाहीत.7 / 9मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या पडताळणीचे काम वरिष्ठस्तरावरून सुरू झाले आहे. या धास्तीमुळे आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी पैसे नाकारण्यासाठीचे अर्ज भरले आहेत. पुढील काळात पैसे नाकारणाऱ्या बहिणींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.8 / 9संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना, आयकर भरणाऱ्या महिला, चारचाकी गाडी नावे असणाऱ्या महिलांची नावे समोर आल्यास त्यांना लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.9 / 9विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपर्यंत काही महिलांनी सदरील योजनेसाठी अर्ज भरले होते. निवडणूक निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन होऊन शासकीय कामे सुरू होण्यास थोडा वेळ लागला होता. त्यानंतर निवडणुकीपूर्वी ज्यांनी ज्यांनी अर्ज भरते होते, त्या महिलांचे अर्ज निकाली काढले आहे.