शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कुणाल कामराचे सीडीआर अन् बँक स्टेटमेंट तपासले जाणार; या प्रकरणाचे 10 महत्वाचे अपडेट्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 21:32 IST

1 / 11
Kunal Kamra Controversy: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत आला आहे. त्याने आपल्या एका शो-मध्ये नाव न घेता शिवसेना अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'गद्दार' म्हटले, ज्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर आतापर्यंत काय-काय झाले, हे जाणून घेऊ...
2 / 11
1. स्टुडिओमध्ये तोडफोड- कुणाल कामराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट कॉमेडी क्लबच्या स्टुडिओची तोडफोड केली. तिथेच हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता.
3 / 11
2. अटकेनंतर आरोपींना जामीन- स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी 12 आरोपींना अटक करण्यात आली अन् काही तासांतच त्यांना जामीन मिळाला. मुंबईतील वांद्रे न्यायालयाने सर्व 12 आरोपींना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
4 / 11
3. हॅबिटॅट स्टुडिओ बंद- शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीनंतर हॅबिटॅट स्टुडिओ बंद ठेवण्याची घोषणा केली. रविवारी रात्री हॉटेल युनिकॉन्टिनेंटलबाहेर शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. इंडियाज गॉट लेटेंट या वादग्रस्त शोचे शूटिंग हॅबिटॅट क्लबमध्येच झाले होते.
5 / 11
4. कुणाल कामरा काय म्हणाला? वादानंतर मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा याच्याशी संपर्क साधला. सूत्रांनुसार, कुणालने आपल्या विधानाचा कोणताही पश्चाताप किंवा खेद नसल्याचे म्हटले आहे. तसेच, न्यायालयाने सांगितले, तरच माफी मागेल, असे तो म्हणाला.
6 / 11
5. स्टुडिओवर बीएमसीची कारवाई- ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामरा याचा शो शूट झाला होता, त्या स्टुडिओचे छत पाडण्याची तयारी बीएमसीने केली होती. यापूर्वीच खार पोलिसांनी स्टुडिओ सील केला आहे, त्यामुळे प्रशासनाने स्टुडिओ पाडण्याची कोणतीही कारवाई केलेली नाही.
7 / 11
6. काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? कॉमेडी करणे हा हक्क आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पण, जाणूनबुजून अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
8 / 11
7. उद्धव ठाकरे काय म्हणाले? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणाल कामरा याने काहीही चुकीचे बोलले नाही. 'गद्दार' म्हणणे म्हणजे कोणावरही हल्ला करण्यासारखे नाही. जे गद्दर आहेत, त्यांना गद्दरच बोलणार.
9 / 11
8. कुणाल कामराची कॉल रेकॉर्डिंग तपासली जाणार- कुणाल कामरा याचे कॉल रेकॉर्डिंग, सीडीआर आणि बँक स्टेटमेंटची चौकशी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. यामागे कोण आहे, ते शोधून काढणार आहेत.
10 / 11
9. सभागृहाचे कामकाज तहकूब- कुणाल कामरा याच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. अनेकवेळा सभागृहाचे कामकाज थांबवावे लागले. कुणाल कामरा याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत केली.
11 / 11
10. कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल- कामराच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. BNS च्या 353(1)(b) (सार्वजनिक गैरव्यवहाराशी संबंधित विधाने) आणि 356(2) (बदनामी) यासह विविध कलमांखाली कामराविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.
टॅग्स :Kunal Kamraकुणाल कामराEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे