शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिलांसाठी महत्त्वाची बातमी: लाडकी बहीण योजनेचे निकष आणखी कठोर; सरकारकडून कोणता निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:31 IST

1 / 8
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत दिवसागणिक वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. विविध कारणांतून ५ लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्यानंतर सरकार निकषांची आणखी कठोर अंमलबजावणी करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
2 / 8
या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या मात्र तरीही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत.
3 / 8
ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांचा या योजनेतून पत्ता कट केला जाणार आहे.
4 / 8
लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे की नाही, हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे समजते.
5 / 8
योजनेत पारदर्शकता राहावी, यासाठी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करावी लागणार आहे.
6 / 8
योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. त्यानंतर योजनेतील पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
7 / 8
ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती आहे.
8 / 8
दरम्यान, 'दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण असे की, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,०००; वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,०००; कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,०००; एकूण अपात्र महिला - ५,००,०००; सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे,' असं महिला आणि बालविकास खात्याने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWomenमहिला