शेतकऱ्यांनो फार्मर आयडी मिळवला का?; योजनांचा लाभ घेण्यासाठी ठरणार उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:33 IST
1 / 7फार्मर आयडीची नवी संकल्पना सरकारने शेतकऱ्यांसाठी आणली आहे. गावोगावचे शेतकरी ही आयडी काढण्यासाठी पुढे येत आहेत. 2 / 7तुम्हाला सरकारी योजनांचा लाभघ्यायचा असेल तर फार्मर आयडी असणे आवश्यक असल्याचे महसूल यंत्रणेकडून सांगितले जात आहे.3 / 7केंद्र सरकारच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पब्लिक फॉर अॅग्रिकल्चरअंतर्गत अॅग्रीस्टॅक हा प्रकल्प संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे. 4 / 7शासनाने अॅग्रीस्टॅकसाठी १४ ऑक्टोबर रोजी आदेश काढला. त्यानुसार गावागावांत शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.5 / 7गावपातळीवरील तलाठी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन कोणतीही शासकीय योजना तसेच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ फार्मर आयडीशिवाय मिळणार नाही, असे सांगत आहेत. यामुळे संगणकीय युगात शेती क्षेत्रही ऑनलाइन होत आहे. 6 / 7शेतीचा सातबारा ज्यांच्या नावावर आहे, अशाच शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढता येणार आहे.7 / 7सोलापूर जिल्ह्यात सातबाराधारक शेतकरी संख्या ११ लाख ३५ हजार ७४२ इतकी असून, यापैकी दोन लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंद केली आहे. नोंद केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे.