अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:54 IST
1 / 7बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अखेर हवाई वाहतूक सुरू होत आहे. २५ डिसेंबरपासून प्रवाशांसाठी विमानतळ खुले होणार आहे. ख्रिसमसच्या दिवशीच विमानतळावरून सेवा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात इंडिगो आणि अकासा एअर सेवा सुरू करणार आहेत.2 / 7अकासा एअर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू करत आहे. पहिली विमान सेवा दिल्ली-नवी मुंबई दरम्यान सुरू होणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी गोवा, कोच्ची आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. 3 / 7अकासा एअर कंपनीकडून सांगण्यात आले की, येणाऱ्या काळात प्रत्येक आठवड्याला नवी मुंबई विमानतळावरून ३०० देशातंर्गत आणि ५० आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण करतील. २०२७ पर्यंत १० मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातही आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार केला जाईल.4 / 7अकासा एअरचे सह संस्थापक प्रवीण अय्यर यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पश्चिम भारतातील हवाई सेवेला आणखी बळ देईल आणि नवीन प्रवाशी, तसेच नवी हवाई मार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी मदत करेल.5 / 7इंडिगो एअरलाईनही नवी मुंबई विमानतळावर सेवा सुरू करत आहे. कंपनी घोषणा केली की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतील दहा शहरांसाठी सेवा सुरू करण्यात येईल. यात दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, नागपूर, जयपूर, कोच्ची, मंगळुरू आणि उत्तर गोवा (मोपा) या हवाई सेवांचा समावेश असेल.6 / 7नवी मुंबई विमानतळ जुन्या मुंबई विमानतळावरील भार कमी करेल. पश्चिम भारतात वाढत्या हवाई सेवेची गरज पूर्ण करण्यासाठी मदत करेल.7 / 7नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ८ ऑक्टोबर रोजी उद्घाटन झाले. ११६० हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या या विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे. एक टर्मिनल आणि एक रनवे तयार झालेला असून, त्यांची वर्षाची क्षमता २ कोटी प्रवाशांची आहे.