1 / 8राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.५१ टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २२ हजार १२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 2 / 8राज्यांत २२ हजार १२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ३६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख २७ हजार ५८० आहे.3 / 8 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेतल्यानंतर आता कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कंबर कसणं गरजेचं आहे. तिसऱ्या लाटेत लहानग्यांना कोरोना संक्रमणाचा धोका आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या चाईल्ड टास्क फोर्सनं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यात लहान मुलांचं इतर आजारांपासून संरक्षण करणा-या लसींवरही भर देण्यात आला आहे.4 / 8लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्साठी त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्या दरम्यान कोविड साथीत फ्लूच्या साथीची भर पडू नये यासाठी ६ महिने ते ५ वर्षांपर्यंत इन्फ्लुएन्झा लसीचे डोस देण्याच्या सूचना चाईल्ड टास्क फोर्स संकल्पना आहेत. 5 / 8सोबतच, लहान मुलांचं इतर आजारांपासून संरक्षण करणाऱ्या लसीकरणाचं वेळापत्रकही कटाक्षानं पाळलं जाण्यासाठी राज्य सरकारनं तयारी करावी अशा सूचना आहेत. त्यामुळे घरातील लहान मुले कोरोनाबाधित झाली तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.6 / 8माईल्ड, मॉडरेट, सिवीअर अशा तीन गटांमध्ये 18 वर्षांखालील कोविड रुग्णांचं वर्गीकरण असिम्पटमेटीक आणि माईल्ड सिम्प्टम्स असलेल्या मुलांना घरीच बरे करता येऊ शकेल. मॉडरेट आणि सिव्हीअर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयात दाखल करावे. कोविड बाधित लहान मुलांवर उपचार करण्यासाठीविशेष डॉक्टरांची टीम तयार करुन त्यांचे प्रशिक्षण करण्यात येतंय. घरी असलेल्या कोरोनाबाधित लहान मुलांचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल वेळोवेळी तपासावी. स्थानिक पातळीवर कोविड सेंटरमध्ये चाईल्ड बेड तयार करावे. मात्र या संपूर्ण काळात लहान मुलांच्या मानसिकतेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.7 / 8 वरचेवर कणकण, ताप आहे का? खोकला थांबत नाही का? मुलं अचानक शांत झालंय का? लघवी करण्यात काही अडचण येतेय का? मुलं खेळता खेळता दमतंय का? अंगावर रॅशेस येणं8 / 8 ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होणं अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि लक्षणांनुसार कोविड संक्रमित मुलांना घरी किंवा रुग्णालयात दाखल करुन उपचार करता येतील.