शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लघुग्रह मुंबईवर २०३२ मध्ये आदळण्याची शक्यता, अजून ७ वर्षे, तोपर्यंत...; शास्त्रज्ञांना विश्वास, सांगितली चार कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:28 IST

1 / 9
एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सुमारे ६४ हजार किमी प्रतितासाच्या वेगाने येत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यानंतर मुंबई ते कोलकाता या भागात कुठेतरी आदळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेकांनी मुंबईला जास्त धोका असल्याचे म्हटले आहे. असे झाले तर भारतासारख्या बलाढ्य देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काय प्रलय घडेल याचाही अनेकजण अंदाज लावत आहेत. परंतू, एक दिलासा देणारी बातमी आली आहे.
2 / 9
या लघुग्रहाला 2024 YR4 असे नाव देण्यात आले आहे. हा ग्रह पृथ्वीवर आदळण्याला अद्याप काही वर्षे असली तरी देखील जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही तज्ञ या लघुग्रहाला अंतराळातच संपवता येईल का, यासाठी देखील प्रयत्न करण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत.
3 / 9
२२ डिसेंबर २०३२ रोजी ३०० फूट उंच लघुग्रह YR4 पृथ्वीवर आदळला तर काय होईल, याचा अंदाज बांधला जात आहे. अ‍ॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड रँकिन या आघाताचे भयानक अ‍ॅनिमेशन तयार केले आहे. शास्त्रज्ञांनी मोजलेल्या YR4 लघुग्रहाच्या मार्गात भारतातील मुंबई आणि कोलकाता सारख्या दाट लोकवस्ती असलेली शहरे आहेत.
4 / 9
असे असले तरी, संगणकीय भौतिकशास्त्र आणि ग्रह विज्ञानाच्या सहयोगी प्राध्यापक कॅरी न्यूजेंट यांनी जास्त काळजी करण्याची गरज वाटत नसल्याचे म्हटले आहे. लघुग्रहाच्या पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वाढली आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
5 / 9
लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता ही जानेवारीत फक्त १ टक्के होती. ती फेब्रुवारीच्या सुरुवातीला. २.३ टक्के झाली. तर या आठवड्यात ती ३.१ टक्के झाली आहे. न्यूजेंट यांनी चिंता न करण्यासाठी चार कारणे दिली आहेत.
6 / 9
पहिले कारण म्हणजे ही घटना २०३२ मध्ये होणार आहे. यामुळे आपल्याकडे तयारीसाठी पुष्कळ वेळ आहे. पुढच्या सात वर्षांत यावर काम केले जाऊ शकते आणि या धोक्यावर काहीतरी उपाय नक्कीच मिळेल, असे कारण न्यूजेंट यांनी दिले आहे.
7 / 9
२०१३ मध्ये रशियात आदळलेला लघुग्रह हा २० मीटर रुंद होता. त्याच्यामुळे नुकसान झाले पण कोणाचा मृत्यू झाला नाही. आताच लघुग्रह हा जागतिक नाही तर क्षेत्रापुरता विनाशकारी असेल. जिथे ही संभाव्य टक्कर होईल तो भाग रिकामा करून हा धोका कमी केला जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.
8 / 9
पृथ्वीचा पृष्ठभाग बहुतेक पाण्याचा आहे. यामुळे समुद्राजवळ टक्कर झाल्यास धोका कमी होऊ शकतो. ४० ते ९० मीटर उंचीच्या या लघुग्रहाची आणि समुद्राची टक्कर झाली तर कोणतेही नुकसान होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
9 / 9
हा लघुग्रह कुठे जात आहे, याची दिशा, वेग आणि त्याने जर का दिशा बदलली तर त्याची माहिती गोळा केली जात आहे. तज्ञ या गोष्टी शोधून काढतील. पण अशी टक्कर होण्यासाठी पृथ्वी आणि लघुग्रह एकाच सौर मंडळात एकाच ठिकाणी यायला हवेत. सध्यातरी अशी शक्यता दिसत नसल्याचे न्यूजेंट यांनी म्हटले आहे.
टॅग्स :NASAनासाEarthपृथ्वीMumbaiमुंबई