नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
'१५-२० टाळकी असताना...'; अजित पवारांनी नाना पटोलेंच्या ऑफरची विधानसभेत काढली हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 20:18 IST
1 / 7मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दोघांना काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. काँग्रेससोबत मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण करू, अशा आशयाची ऑफर नाना पटोलेंनी दिली होती.2 / 7'अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांची अवस्था बिकट आहे. पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाहीत, अशी अवस्था भाजप त्यांची करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडे त्यांनी यावं. दोघांनाही मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय. आम्ही ते पूर्ण करू', असे नाना पटोले म्हणालेले.3 / 7नाना पटोलेंच्या ऑफरची दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी 2.० अशा चर्चेने फेर धरला. पवार-शिंदे आले तर कसे चित्र असेल, म्हणून आकडेमोडही सुरू झाली.4 / 7या चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट विधानसभेत बोलतानाच यावर उत्तर दिले आणि नाना पटोलेंच्या ऑफरमधील हवा काढून टाकली. अजित पवारांनी आमदारांच्या संख्येवरून खिल्ली उडवत सुनावलं.5 / 7अजित पवार म्हणाले, ''हा अर्थसंकल्प फक्त एका वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाही. उद्याची पाच वर्षे, २०२४ ते २०२९.. ती पाच वर्षे अशी आहेत की, कुणी गंमतीने जरी म्हटलं की, आमक्याने मुख्यमंत्री व्हावं, तमक्याने मुख्यमंत्री व्हावं आम्ही पाठिंबा देतो.'6 / 7'अरे तुमच्याकडे माणसंच नाहीत, कशाचा पाठिंबा देतो? २० टाळकी असताना, १५ टाळकी असताना, १० टाळकी असताना... पाच वर्ष या सरकारला ब्रह्मदेव आला तरी धक्का लावू शकत नाही', असे अजित पवार म्हणाले.7 / 7अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा झाली. विविध सदस्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे अधोरेखित करत अजित पवारांनी उत्तर दिले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी अर्थसंकल्पावर बोलताना महायुती सरकारवर केलेल्या टीकेलाही अजित पवारांनी उत्तर दिले.