शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आबांच्या कन्येच्या लग्नात अजितदादा आणि सुप्रिया सुळेंनी केला पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 09:21 IST

1 / 5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद यांच्याशी पुण्यात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
2 / 5
या विवाह सोहळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर थांबून स्वागत केले.
3 / 5
सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांना अक्षता वाटल्या. या दोन्ही (अजित पवार आणि सुप्रिया सुळे) भावंडांचे अगत्य पाहून सर्वजण भारावून गेले होते.
4 / 5
आर. आर. पाटील अर्थात आबांची कन्या स्मिता पाटील आणि माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आंनद थोरात यांच्या विवाह सोहळयाच्या ठिकाणी अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सकाळपासूनच हजर होते.
5 / 5
सुप्रिया यांना पाहून सुमन पाटील यांना अक्षरशः गहिवरून आले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करीत त्यांना अक्षता वाटल्या.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेmarriageलग्न