1 / 7शरद पवारांनी काही फोटो शेअर केले. या फोटोत शरद पवारांच्या हातात आंबा आहे. हा एकच आंबा तीन किलोंचा आहे. आंब्याची ही नवी जात विकसित केली आहे, सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने!2 / 7सोलापूर जिल्ह्यातील दत्तात्रय घाडगे यांनी शरद पवारांना जो आंबा भेट दिला आहे, त्याचे नावही खास आहे. आंब्याच्या या नव्या वाणाचे नाव ठेवण्यात आले शरद मँगो!3 / 7दत्तात्रय घाडगे यांनी भेट घेऊन ही खास भेट दिली. शरद पवारांनी याबद्दल लिहिताना म्हटलं की, 'दत्ता घाडगे यांनी भेट घेतली आणि त्यांनी तब्बल ३ किलो वजनाचा आंबा भेट दिला. फळांचा राजा असलेला आंबा आपला गोडवा टिकवून प्रयोगशील आंबा बागायतदारांना समृद्ध करतोय हे पाहून समाधान वाटतं.'4 / 7शरद पवारांनी आंब्याच्या पेटीचेही फोटो शेअर केले आहेत. दत्तात्रय घाडगे हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या अरण गावाचे आहेत. त्यांनी आमराईतील आंब्याच्या वेगवेगळ्या जातीच्या झाडांवर प्रयोग करून हा आंबा विकसित केला.5 / 7दत्तात्रय घाडगे यांनी त्यांच्या बागेत आंब्याच्या वेगवेगळ्या जातींची कलम केली आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात सुरू केलेल्या फळबाग योजनेचा लाभ घेतला आणि त्यांनी ही बाग सुरू केली.6 / 7फळबाग योजनेती अर्थसाहाय्याच्या मदतीने त्यांनी तब्बल ८ एकर जमिनीवर १० हजार केशर आणि आंब्यांची कलमे लाववली होती. हे काम करताना त्यांनी दोन-तीन आंब्यांची वाण एकत्र करून नवीन वाण विकसित करण्याचे काम सुरू केले.7 / 7दत्तात्रय घाडगे यांना यात यश आले. पवारांनी सुरू केलेल्या फळबाग योजनेच्या मदतीने ही बाग उभी राहिल्याने आणि त्यातूनच आंब्याची नवीन जात विकसित करण्यात यश आल्याने त्यांनी या आंब्याचे नाव शरद मँगो असे ठेवले.