शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अनंत अंबानींचे वजन पुन्हा वाढले! नीता अंबानी यांनी सांगितले यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:35 IST

1 / 8
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या त्यांच्या वजनामुळे खूप चर्चेत आहेत. वजन कमी केल्यानंतर त्याचे वजन पुन्हा एकदा वाढले आहे.
2 / 8
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा राधिका मर्चंट यांच्यासोबत नुकतीच एंगेजमेंट झाली आहे.
3 / 8
राधिका मर्चंट तिच्या सुंदर आउटफिटमुळे चर्चेत आहे, तर अनंत अंबानी देखील त्यांच्या वजनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान नीता अंबानी यांनी मुलगा अनंत यांच्या वजनाबद्दल खुलेपणाने सांगितले होते.
4 / 8
एका मुलाखतीदरम्यान त्यांनी कारण सांगितले होते. अस्था या आजारपणामुळे अनंतला खूप स्टेरॉईड्स देण्यात आले होते. त्यामुळे त्याचे वजन वाढले आहे, असं नीता अंबानी यांनी सांगितले.
5 / 8
अनंत यांचे वजन पूर्वी 208 किलो होते. वजन कमी केल्यानंतर त्यांचे वजन पुन्हा खूप वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, वजन वाढण्यामागे कोणत्याही औषधाचा अतिवापर किंवा वाईट जीवनशैलीही कारणीभूत ठरू शकते.
6 / 8
2016 मध्ये अनंत अंबानींच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने अनेकांना आश्चर्यचकित केले होते. अनंतने 10 महिन्यांत 108 किलो वजन कमी केले होते. यादरम्यान त्यांची आई नीता अंबानी यांनी सांगितले होते की त्यांनी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत केली.
7 / 8
अनंत अंबानी रोज 5 ते 6 तास व्यायाम करायचे. यात सुमारे 21 किमी चालणे, उच्च तीव्रतेचा व्यायाम, योगासने, वजन प्रशिक्षण आणि कार्यात्मक प्रशिक्षण समाविष्ट आहे.
8 / 8
अनंत अंबानी हिरव्या भाज्या, कडधान्ये, मोड आलेले धान्य आणि पनीर खातात.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीJioजिओRelianceरिलायन्स