1 / 7 कोल्हापुरातील गांधी मैदान येथे गुरुवारी महिला दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील गु्रप व सतेज ऊर्फ बंटी पाटील फौंडेशन आणि प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरतर्फे आयोजित केलेल्या ‘वॉक फॉर प्रोग्रेस’ या रॅलीच्या उद्घाटन हवेत फुगे सोडून करण्यात आले. (छाया : दीपक जाधव)2 / 7कोल्हापुरातील गांधी मैदान येथे गुरुवारी महिला दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील गु्रप व सतेज ऊर्फ बंटी पाटील फौंडेशन आणि प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरतर्फे आयोजित केलेल्या ‘वॉक फॉर प्रोग्रेस’ या रॅलीत मान्यवर महिलांनाही सेल्फीचा मोह आवरता आला नाही. त्यात संयोगीताराजे, माजी महापौर सई खराडे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. (छाया : दीपक जाधव)3 / 7कोल्हापुरातील गांधी मैदानात गुरुवारी आयोजित केलेल्या ‘वॉक फॉर प्रोग्रेस’ या रॅलीत लोकमान्य टिळकांची वेशभूषा परिधान केलेली युवती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. (छाया : दीपक जाधव)4 / 7कोल्हापुरातील गांधी मैदानात गुरुवारी आयोजित केलेल्या ‘वॉक फॉर प्रोग्रेस’ या रॅलीत बुलेटवरून फेरफटका मारणारी युवती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. (छाया : दीपक जाधव)5 / 7कोल्हापूरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यातर्फे जागतिक महिला दिन पोलिस ठाण्याच्या आवारात साजरा करण्यात आला.यावेळी महिलांनी भगवे फेटे परिधान केले होते.6 / 7जागतिक महिला दिनानिमित्त कोडोली पोलिस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये महिलांसह कोडोली हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.7 / 7जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर पोलिस दलातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात निर्भया पथकातील महिलांचा गौरव रुपाली नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी विश्वास नांगरे-पाटील,रुची राणा,संजय मोहिते आदी उपस्थित होते.