शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापूरात ‘शिक्षण बचाव’ महामोर्चा, हजारो जमले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 4:18 PM

1 / 11
कोल्हापूरातील गांधी मैदान येथे शुक्रवारी ‘शिक्षण बचाव’ या महामोर्चासाठी जमलेले हजारो आंदोलक. (छाया : आदित्य वेल्हाळ)
2 / 11
कोल्हापूरातील गांधी मैदान येथून शिक्षण बचाव मोर्चाची सुरुवात झाल्यानंतर अग्रभागी महापौर स्वाती यवलुजे यांच्यासह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)
3 / 11
शिक्षण बचाव महामोर्चात शिक्षणाचे कंपनीकरण करणाऱ्यां शासनाचा निषेध म्हणून काही शिक्षकांनी हलगीचा कडकडाट करीत सहभाग नोंदवला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
4 / 11
शिक्षण बचाव महामोर्चात लाठणे घेऊन शासनाचा निषेध करणाऱ्या महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
5 / 11
शिक्षण बचाव मोर्चा दसरा चौकातून व्हिनस कॉर्नर कडे आल्यानंतर टिपलेले छायाचित्र. (छाया : आदित्य वेल्हाळ)
6 / 11
‘गोरगरीबाचे शिक्षण वाचलेच पाहीजे,शाळा वाचवा कंपनीकरण हटवा,वाडया वसत्यावरील शाळा राहील्याच पाहीजेत, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, शिक्षणावर ६टक्के खर्च झालाच पाहीजे, अशा घोषणा फलक गळ्यात अडकवून कोल्हापूरात शिक्षक महासंघाच्या सदस्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
7 / 11
विद्यार्थ्यांचाही लक्षणीय सहभाग उन्हाची तमा न बाळगता मोर्चासाठी शिक्षक, पालक, नागरीकांसह लहानग्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. अनेकांच्या तोंडी ‘शिक्षण वाचवा‘अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
8 / 11
कोल्हापूरात शिक्षण बचाव मोर्चासाठी गांधी मैदान येथे शुक्रवारी पारंपारिक वेषात आलेल्या एका रणरागिनीने हाती तलवार उगारून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
9 / 11
शिक्षण बचाव महामोर्चात लाठणे घेऊन शासनाचा निषेध करणाऱ्या महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
10 / 11
शिक्षण बचाव महामोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांसाठी दसरा चौक येथे आजरेकर फौंडेशनच्यावतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
11 / 11
शिक्षण बचाव मोर्चात ‘शिक्षण वाचवा ’ अशी पाटी हाती घेतलेल्या बालकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरeducationशैक्षणिकSchoolशाळा